जिव मुठीत धरून करावा लागतो प्रवास
पालम प्रतिनिधी
लोहा, पालम , गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पहायला मिळत आहे या रस्त्याची दैयनीय अवस्था पाहुन .राष्ट्रीय महामार्ग श्रेणी -1उप अभियंता सुभाष हाके कायम उपविभाग पालम येथे राहून देखभाल दुरुस्ती करतील का,असा प्रश्न तालूक्यातील
पडला आहे.
..
पालम तालूक्यातील राष्ट्रीय महामार्ग पालम येथून नांदेड, पुणे , मुबंई तसेच जडवाहतूक दळणवळण चा मुख्य रस्ता असुन येथुनच आरोग्य सेवाच्या रूगनवाहीका नादेड, कडे जात असतात.तरी पण यारस्ता ची दैयनिय दुरवस्था जैसी थे असुन, गंगाखेड परभणी नादेड जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग रस्ता श्रेणी 1 आहे .हा रस्ता अनेक तालुके, मुख्य शहर ,व खेडे गावांना जाणारा हा रस्ता पालम पासून काही अंतरावर जीवघेण्या खड्डे तर नादेडकडे जाणाऱ्या काही अंतरावर प्रचंड खडे पडल्यामूळे , खडयात रस्ता कि,रस्त्यात खड्डा अशी दुरवस्था रस्त्याची झाली आहे. या रस्त्यावर नेहमी दुचाकीस्वार तालूक्यातील येत जात असतात.या रस्त्यावर फोरव्हिलर मोठमोठे माल वाहतूक करणारे जड वाहनाची जास्त प्रमाणाची ,वर्दळ असते. टू व्हिलर ही गाडी व्यवस्थीत चालवता येत नाही. अनेक नागरिकाना आपले हातपाय गमावले लागले आहे.तर काहीच्या जिवाशी हा रस्ता खेळला आहे .अनेकांना प्राण गमावले आहेत. दुचाचाकी स्वारांना हा राष्ट्रीय रस्ता जीवावर बेतले आहे.परतू अनेक वर्तमान पत्रातून बातम्या प्रकाशित केल्या आहेत .पण या रस्त्याची थातुरमातुर दुरस्ती करण्यात आली कारण उपविभागीय अभियंता श्रेणी 1 यांचै कार्यालय जायकवाडी पालम येथे नावालाच थाटात उभा असून ,उप अभियंता सुभाष हाके नादेड विभागाला जास्त प्रमाणात उपस्थितीत असल्यामुळे . अनेकाचे बळी जाणारे जीव वाचतील का असा प्रश्न तालूक्यातील लोकांना पडला असल्याचे दिसते , सदरिल उपअभियंता कायम कार्यालयात उपस्थितीत राहुन या रस्त्याची ,देखभाल,दुरुस्तीची करावी. अशी मागणी पालम तालुक्यातील वाहनधारक नागरिकातुन होत आहे .