संगमेश्वर : तालुक्यातील मूळचा साखरपा जाधववाडी येथील कु.शुभम दिलीपकुमार जाधव अण्णा युनिव्हर्सिटी मद्रास येथे एरोनॉटिकल इंजिनीयर पदवी प्राप्त केली.आज त्याला पदवी प्रदान कार्यक्रमात गौरविण्यात आले.शुभम हा मद्रास येथील उद्योजक दिलीपकुमार जाधव यांचा मुलगा व मा. सरपंच केशवराव जाधव यांचा नातू आहे.

त्याच्या या यशामुळे साखरपा सह परिसरातील मित्रमंडळी व नागरिकांनी कौतुक केले.त्याचे बालपणापासूनच शिक्षण चेन्नई येथेच झाले.त्याला लहानपणापासून विमान विषयक आकर्षण असल्याने या क्षेत्रात भवितव्य घडवण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी देखील त्याच्या स्वप्नं करण्याचे दृष्टीने आवश्यक शिक्षण दिले.त्याने एरोनॉटिकल इंजिनीयरींग 4 वर्षाचे शिक्षण मद्रास युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले. 

आज पदवी प्रदान कार्यक्रमात त्याच्या शिक्षकांनी देखील कौतुक केले. तो शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रात देखील सहभागी होत असल्याचे सांगितले.त्याने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील आणि सर्व कुटुंबीयांचे असल्याचे सांगितले.त्याने त्याच्या प्रोजेक्ट मध्ये विशेष पद्धतीचा प्रोजेक्ट केला होता. तसेच त्याला एअरक्राफ्ट मेंटेनन्स,टेक्निशियन, ग्राउंड शाफ्ट मध्ये विशेष कौशल्य अवगत केले आहे. त्यांचे शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे सोशल मीडियाद्वारे आभार मानले.