सावकाराने केलेल्या अन्यायाविरोधात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार्या माजलगाव तालुक्यातील पुनंदगावच्या पुजा शेखर सावंत या मुलीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट भ्रमणध्वनीवरून संवाद साधत घटनेची माहिती समजावून घेतली. अन् जिल्हा प्रशासनाला सुचना दिल्या होत्या. दुपारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी स्वत:हून पुजा शेखर सावंत यांच्या घरी भेट देवून माहिती घेत. तत्काळ चार अधिकार्यांची समिती स्थापन केली अन् शुक्रवार पर्यंत न्याय देण्याचे आश्वासन दिले. सावंत कुटुंबीयांनी कुठलेही टोकाचे पावूल उचलू नये पूर्ण प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. म्हणत सावंत कुटंबीयांना धिर दिला. सदरचे प्रकरण हे सर्व प्रथम सायं.दै.बीड रिपोर्टरने प्रकाशझोतात आणल्यानंतर या प्रकरणाचे गांभिर्य बीड जिल्हा प्रशासनासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी काल पुजा सांवत हीच्या संवाद साधल्यानंतर जिल्हाधिकारी तुमच्या भेटील येणार असल्याचे सांगितले होते. त्यांनर आज दुपारी जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा वडवणी तहसिलदार भास्कर साहेब, उपजिल्हाधिकारी बाफना मॅडम, माजलगावच्या तहसिलदार वर्षा मनाळे, नायब तहसिलदार भंडरी हे स्वत: सावंत कुटुंबियांच्या भेटील गेले. जिल्हाधिकारी शर्मा यांनी सविस्तर माहिती घेत शेतकरी सावंत यांना न्याय देण्यासाठी आपण तत्काळ चार अधिकार्यांची समिती स्थापन केली असून शुक्रवार पर्यंत कारवाई करु असे आश्वासन दिले. तर सावंत कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण प्रशासन असल्याचे सांगितले.