जिंतूर / प्रतिनिधी

 

जिंतूर: शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने, येणाऱ्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव निमित्ताने दि.०१ वार शनिवार रोजी ठीक सायं. ५ वा. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर येथून पथसंंचालनास सुरुवात झाली. सुरुवातीला सर्व स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाला वंदन केले. त्यानंतर हे पथसंचलन सुरू झाले. भगवा ध्वज घेऊन एक स्वयंसेवक अश्‍वारूढ होता. 

             दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विजयदशमीच्या निमित्ताने जिंतूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनामध्ये सर्व स्वयंसेवक हे गणवेशात सहभागी झाले होते. हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. शहरातील मुख्य श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून-परत छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून-जागृती हनुमान मंदिर ते परत श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर आदी भागातून नेण्यात आले. हातात काठ्या, योग्य नियोजन व शिस्त या पथसंचलनात पाहायला मिळाली.

              या पथसंंचालनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवकासोबतच बाल स्वयंसेवक देखील सहभागी झाले होते. पथसंंचालनावेळी नागरिकांनी पथसंंचालनामध्ये चालणाऱ्या स्वयंसेवकावर फुलांचा वर्षाव केला. हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती