रत्नागिरी : झरेवाडी- गावात नुकताच विधवा प्रतिबंधी कायदा संमत झाला, त्या कायद्याला अनुसरून जनजागृती व्हावी म्हणून सौभाग्यवती स्त्रियांसोबत गावातील विधवा स्त्रियांच्या सन्मानाचा हळदीकुंकू आयोजित करण्यात आला होता. 

 स्त्रियांचे सबळीकरण, विधवा प्रतिबंधि कायदा अंतर्गत जनजागृती, स्त्रियांची सुरक्षा, संरक्षण या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र शासनाशी संलग्नित "सखी वन स्टॉप सेंटर रत्नागिरी" या संस्थेचे केंद्र प्रशासक श्रीमती अश्विनी मोरे मॅडम यांना निमंत्रित करण्यात आले होते. 

गावातील 300 पेक्षा अधिक स्त्रियांचा या उपक्रमांमध्ये उस्फूर्त सहभाग आणि मोरे मॅडम यांनी वरील विषयांवरती खेळीमेळीच्या वातावरणात केलेले मार्गदर्शनपर संवाद, त्याला महिलांचा प्रतिसाद यातूनच या उपक्रमाचे उद्दिष्ट, स्त्री शक्तीचा जागर संपन्न झाल्याचे चित्र स्पष्ट होत होते. 

उत्सवाच्या दरम्यान संस्कार नेहरू युवा मंडळ हे सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करते. महिलांसाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मार्गदर्शक अश्विनी मोरे मॅडम आणि त्यांचे सहकारी यांचे स्वागत गावच्या महिलांच्या वतीने गावप्रमुख यांच्या सौभाग्यवती स्वरा कळंबटे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले. तर कार्यक्रमाची सांगता स्नेहाली गोताड यांनी आभार व्यक्त करून केली.

महिलांनी या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष श्री अवधूत कळंबटे व मंडळाच्या सर्व सभासदांनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.