रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यानी भाट्ये-रत्नागिरी येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला भेट दिली.

अभ्यासभेटीत संशोधन केंद्रातील गांडूळखत प्रकल्प व मधमाश्या पेटी प्रकल्प विभागाला भेट दिली. यावेळी संशोधन केंद्रातील कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ डॉ.संतोष वानखेडे यांनी गांडूळखत प्रकल्प तयार करण्यासाठी आवश्यक गांडूळ प्रजाती, प्रकल्प बांधणी, याबाबत पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. फळबागेत मधमाश्या पेट्याचं महत्त्व, पेट्यामध्ये मधमाश्या कश्याप्रकरे मध गोळा करतात व मधमाश्या पेट्या लावण्याचा कालावधी या सर्व विषयांवर सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.

अभ्यास भेटीसाठी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र विभागातील प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, प्राणिशास्त्र विभागप्रमुख प्रा. दीपिका मयेकर व वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.विनय कलमकर सहभागी झाले होते.