चिपळूण : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सावर्डे गावातील युवा कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. या धडाडीच्या युवा कार्यकर्त्यांमुळे सावर्डे विभागात राष्ट्रवादी काँगेस पक्ष मजबूत होणार आहे. अशा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांना आहे.
यावेळी सावर्डे गावचे उद्योजक केतन पवार, तंटामुक्ती अध्यक्ष, बाबू शेठ चव्हाण, सावर्डे उपसरपंच जमीर मुल्लाजी, माजी सरपंच शांताराम बागवे, माजी सरपंच शौकत भाई माखजनकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू शेठ मोहिरे, ग्रामपंचायत सदस्य शरद चव्हाण, सोसायटी चेअरमन सूर्यकांत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अजित कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य संदीप खेराडे, संजय चव्हाण, नितिन चव्हाण,संतोष मेस्त्री, बावा चव्हाण, अरुण वारे, किशोर भांड आदी प्रमुख उपस्थित होते.