रत्नागिरी : येथील हर्षा हॉलिडेजला पर्यटन संचालनालयाला जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा प्रशासन, रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे अल्पबचत सभागृहात आयोजित जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते संचालक सुहास ठाकुरदेसाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी श्री. रमेश कीर, श्री. राजू भाटलेकर, श्री. युयुत्सु आर्ते, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे श्री. माळी, संजय यादवराव आदी मान्यवर उपस्थित होते. मैत्री ग्रुपच्या माध्यमातून संचालक सुहास ठाकुरदेसाई आणि कौस्तुभ सावंत यांनी सन २०१७मध्ये हर्षा हॉलिडेजची स्थापना केली. याचा मुख्य उद्देश हा होता की, कोकणचे पर्यटन वाढविणे, कोकणात जास्तीत जास्त पर्यटक येण्याकरिता मुंबई, पुणे येथे वेगळ्यावेगळ्या प्रदर्शनात सहभाग घेतला. नंतर रत्नागिरीमध्ये पर्यटकांचा मुक्काम वाढण्यासाठी हर्षा स्कूबा डायव्हिंगची प्रथमच सुरुवात केली. याला पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. यानंतर त्यांना एमटीडीसीचा पर्यटन मित्र हा पुरस्कार सुहास ठाकुरदेसाई यांना प्राप्त झाला. नंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले. गाईड प्रशिक्षण कार्यक्रम, कोकणी खाद्यपदार्थांची स्पर्धा, पर्यटन परिषद, टूर ऑपरेटर व्हिजिट असे अनेकविध उपक्रम राबविले. यामुळे रत्नागिरीत गेल्या काही वर्षांत पर्यटनाला चांगले दिवस येऊ लागले आहेत.