भंडारी समाज हा लढवय्या समाज :-आमदार महेंद्र दळवी

अलिबाग:-अमूलकुमार जैन

भंडारी समाज हा लढवय्या समाज म्हणूनही ओळखला जातो. पूर्वी राजाच्या सैन्यात भंडारी समाज मोठय़ा प्रमाणावर असे. भंडारी समाजातीलच मायनाक भंडारी हे शिवाजी महाराजांच्या आरमारात नौदल प्रमुख होते,असे प्रतिपादन अलिबाग मुरूड चे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरूड शहरातील भंडारी बोर्डिंगच्या सभागृहाच्या भूमिपूजनप्रसंगी केले.

         यावेळी रेवदंडा येथील उद्योगपती प्रफुल्ल मोरे भंडारी बोर्डिंगचे तालुका अध्यक्ष श्रीकांत सुर्वे,शिवसेना तालुका अध्यक्ष ऋषिकांत डोंगरीकर,मुरुड शहर अध्यक्ष्य संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष स्नेहा पाटील, माजी नगराध्यक्ष अशोक धुमाळ,उप जिल्हाप्रमुख तथा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत बेलोसे,संघटक दिनेश मिणमिने,निलेश घाटवल,यशवंत पाटील,शंकर खेडेकर,प्रफ्फुल मोरे,नाना घुमकर,अमोल लाड,मुख्याधिकारी पंकज भुसे, अजय पवार,मुख्य विश्व्स्थ निशिकांत खोत,अशोक पाटील,राजन पुलेकर,मोहन करणंदेकर,रवी कासेकर,ऍड रुपेश पाटील,आशिष पालशेतकर,जागन पुलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

    मुरुड शहरातील भंडारी बोर्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नातून वैशिष्ठ पूर्ण अनुदानातून ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त करून दिला आहे.या सभागृहाचे भूमिपूजन आमदार दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

    यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले की, भंडारी समाजाचा मुख्य व्यवसाय ताडी-माडी तयार करणे व शेती हा आहे. ,मुख्य व्यवसाय ताडी-माडी तयार करणे व शेती हा आहे.त्यांनी त्यांच्या बागेत आंबा, काजू या फलवृक्षाबरोबरच नारळी पोफळीच्या सुंदर बागा समुद्र किनाऱ्यालगत फुलवलेल्या बागा रायगड या जिल्ह्यांसहित कोकणात गोव्यात पाहण्यास मिळत आहे.मुरुडचा इतिहास मोठा आहे.निवडणूक मध्ये सर्वपक्षीय विरोधात निवडणूक लढवली गेली आहे त्यामध्ये मुरूड कराची मोलाची साथ मिळाली असल्याने तसेच माईईच्या माध्यमातून नगर पालिका निवडणूक जिकून ती सेनेच्या ताब्यात घेतली.मला मुरूड मध्ये प्रवेश हा आपाच्या मार्फत झाले.माझे बालपण हे थळ येथील करूळकर यांच्या घरात गेले आहे.भंडारी समाज हा लढवय्या आहे.माझ्या आगरी समाजाच्या पुढे आहे.भंडारी समाज हा हट्टंवादी समाज आहे.माझ्या सारख्या सर्वसामान्य आहेसरकारचा आमदार म्हणून मी विकास कामे करीत राहणार नाही.दोन वर्षात जे अनुभव आले आहेत ते भयावह आहेत.दसरा मेळाव्यात आरोप प्रत्यारोप ह्या मध्ये स्पष्टीकरण होणार आहे.बौद्ध समाजाचा पन्नास वर्षांपूर्वीचा काम प्रलंबित होते ते मार्गी लागले आहे.राजकिय वलय निर्माण झाले आहे त्याला अधिक श्रेय हे मुरूड कर यांची आहे.तक्रार वजा ही प्रत्येक ठिकाणी होत असते. येणाऱ्या काळात प्रत्येक समाजाला मदतीचा हात कायम राहणार आहे. शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहचल्या पाहिजे.यासाठी प्रत्येक कार्यकर्ता झटला पाहिजे.मुरुड नागरपरिषदेवर शिंदे गटाचेच प्राबल्य राहणार आहे.या पुढील काळात मुरुड चा विकास झालेला पहावयास मिळणार आहे.नियोजन मधून 40 टक्के निधी ग्रामीण भागात देण्यात येणारआहे.जल जीवन च्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविला जाणार आहे.जे काही आयुष्य तुमच्यासाठी समर्पित आहे.राजकारण मध्ये संबंध जोडणे म्हणजे प्रगती पथावर जाणे आहेसर्वांनी एकत्रित या आणि नगरपालिका ही बिनविरोध देण्यात यावी असे आव्हान

मुरूड शहर हे पर्यटन शहर आहे.येणाऱ्या काळात समाजाला कुठेही जाण्याची गरज नाही.मी तुमच्या घरातील एक आहे.त्यामुळे तुम्हाला कुठे अडचणी भासू देणार नाही.प्रफुल्ल मोरे हा विलोभनीय व्यक्ती असून त्याने दिलेला शब्द पूर्ण करणारा आहे.महाराष्ट्रात वेगळे परिवर्तन आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाचा झंजावत सुरू असल्याने आमच्या सारख्यास र्वसामान्य आमदारावर विश्वास ठेवतात.

    मुरूड नगरपरिषदेचे मुख्यधिकारी पंकज भुसे यांनी सांगितले की,आमदार दळवी यांनी हा निधी आणला आहे तो वैशिष्ट्यपूर्ण आहे.तीन वेळा मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.ह्या इमारतीच्या सभागृहाच्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.सदर सभागृहासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून सदरचे का सुरु होण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

यावेळी भंडारी बोर्डिंगचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे उर्फ बाबू यांनी प्रास्तविक करताना सांगितले की,मुरूड शहरातील भंडारी बोर्डिंग संस्था ही 102 वर्षाची आहे.या संस्थेसाठी कैलासवासी राजाराम खोत यांनी त्याकाळी पाच हजार रुपयांची जमीन खरेदी करून समजासाठी दिली होती.त्यावेळी भंडारी बोर्डिंगचे उदघाटन तत्कालीन नबाब यांच्या हस्ते करण्यात आले होते.पदवी साठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 30000 रुपये दोन वर्षासाठी बिनव्याजी मदत करण्यात येत आहे,गणवेश वाटप, आय टी आय मध्ये तीन विद्यार्थी हे डिझेल मकीनेकल झाले असून अजून काही शिक्षण घेत आहे.आमदार महेंद्र दळवी यांनी या सभागृहा साठी पन्नास लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे.भंडारी समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे अभिवचन यावेळी त्यांनी दिले.मात्र त्यानिधीतून सभागृह उभे राहील मात्र त्याला आद्यवत करण्यासाठी ही आमदार मदत करण्याची मागणीही केली.

      यावेळी माजी नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.सदरील कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अरविंद पाटील यांनी केले.तर सुत्रसंचलन प्रभात नाईक व उषा खोत यांनी केले.सदरील कार्यक्रमासाठी मुरुड तालुक्यातून मोठ्या संख्येने भंडारी समाज कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होता.