औरंगाबाद:- दि.1 ऑक्टोबर (दीपक परेराव) औरंगाबादेत स्वतःचे घर खरेदीसाठी एवढी उत्सुकता ग्राहकांमध्ये पाहण्यास मिळाली की, क्रेडाई ड्रीम - होम एक्स्पोच्या बुधवारी - उद्घाटनानंतर अनेक फ्लॅट, रो हाऊसचे बुकिंग झाले.या शानदार सुरुवातीमुळे गृहनिर्माण क्षेत्रात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दसऱ्यानंतर घरांच्या किंमती प्रति चौरस फूट ५०० ते ७०० रुपयांनी वाढतील. त्याआधीच गृहप्रदर्शनाचा फायदा उचलत अनेकांनी घर बुकिंग करणे सुरू केले. एवढेच नव्हे तर बांधकाम व्यावसायिक व बँकांनी दिलेल्या सवलतीचा फायदाही ग्राहकांना मिळत आहे.

बीड बाय पास जबिंदा मैदान वर पहिल्यांदाच मराठवाडास्तरीय गृहप्रदर्शन भरविले आहे. यात १०० बांधकाम व्यावसायिकांच्या २५० गृहप्रकल्पांची माहिती मिळत आहे.१५ लाखांपासून ते अडीच कोटीपर्यंतचे बहुपर्याय उपलब्ध आहेत. २८ सप्टेंबर ते प्रदर्शन २ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असेल.आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठवाड्यातील जनतेने एकदा अवश्य भेट द्या असे आवाहन क्रेडाई ड्रीम होम एक्स्पोच्या समन्वयकांनी केले आहे.