सेवा पंधरवडा निमित्त मौजे कुंभारवाडी या ठिकाणी आज दिनांक 30.09.2022 रोजी स्मार्ट कॉटन या योजनेअंतर्गत द्वितीय प्रशिक्षण पार पडले. यावेळी डॉक्टर गायकवाड बोलत होते त्यांनी कापसातील विविध किडींची ओळख शेतकऱ्यांना करून देताना त्याचे एकात्मिक नियंत्रण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझरचे विस्तार अधिकारी श्री येवले यांनी मोसंबी ऊस व कापूस या पिकातील खत व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन संदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी श्री खेडकर यांनी प्रशिक्षणामध्ये PMFME योजनेची सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली व या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे ही आव्हान केले.तसेच महाडीबीटी अंतर्गत एससी एसटी व इतर लाभार्थ्यांनी आवश्यक बाबीसाठी ऑनलाईन करून या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.तसेच शेतकऱ्यांना कृषी विविध योजनांची माहिती देताना ई पीक पाहणी,पीएम किसान अंतर्गत ई केवायसी करण्यासाठी आवाहन केले. श्री बी आर मोहळकर यांनी प्रस्ताविकामध्ये स्मार्ट कॉटन अंतर्गत एक गाव एक वाण या पुन्हा एकदा उद्दिष्टे व करावयाच्या कारवाई संदर्भात शेतकऱ्यांना अवगत केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कृषी सहाय्यक बी आर मोहोळकर यांनी केले तर कार्यक्रम संपल्यानंतर श्री वेडी जाधव कृषी पर्यवेक्षक यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला.