रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेली एसटी पार्सल सेवा कोरोना व एसटी कर्मचारी संपात बंद झाली होती.ही सेवा सुरू केली आहे. महामंडळाची ही सेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी ग्राहकांनी पाठपुरावा केला होता. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एसटी पार्सल सेवा सुरू झाली आहे. त्याचा व्यापारीबंधूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी पार्सल सेवेच्या मे. गुणीना कमर्शियल प्रा. लि. मुंबई कंपनीतर्फे करण्यात आले आहे. ही सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या माध्यमातून राज्यात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान व अतिजलद वेगाने देण्यात येते. ती किसनलाल गेहीराम कंपनी यवतमाळ प्रस्तावित पार्सल परवाना धारक मे. गुणीना कमर्शियल कंपनीतर्फे राज्यभरात देण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, लांजा, देवरूख, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड या बसस्थानकात पार्सल सेवा सुरू केली आहे. तरी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.