औरंगाबाद : निकृष्ट दर्जाची भगर विक्रीप्रकरणी वैजापूरमध्ये दहा विक्रेत्यांवर गुन्हे अन्न व औषध विभागाच्या पथकाने विषबाधित रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार , त्यांनी भगर खरेदी केलेल्या पाच किराणा दुकानातून भगरीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी ताब्यात घेतले तसेच एका ठिकाणी १३ हजार रुपये किमतीचा ८२ किलो भगर साठा त्यांनी मंगळवारी रात्री जप्त केला . याच प्रकरणात वैजापूर पोलिसांनी रुग्णांचे जबाब नोंदवल्यानंतर पोलिस कर्मचारी कुलदीप नरवडे यांच्या फिर्यादीवरून भादंविनुसार अपायकारक पदार्थांची विक्री आणि दुखापत या कलमाखाली शहरातील सबका मलिक एक किराणा दुकान रवींद्र किराणा दुकान , रमेश गोरख त्रिभुवन यांचे किराणा दुकान , बाळू मुर्गादिया यांचे किराणा दुकान , जय बाबाजी किराणा दुकान , नवीन भाजी मंडईसमोरील हिरण यांचे किराणा दुकान , देवकर यांचे किराणा दुकान या सात दुकानंवर , तर ग्रामीण भागातील घायगाव येथील भुसारी यांचे दुकान व लोणी बु . येथील वजीर भाई यांचे रिहान किराणा दुकान , शांतीलाल पोपटलाल संचेती यांच्यावर गुन्हे दाखल केले . तपास सपोनि विजय नरवाडे करत आहेत रुग्णालयात दाखल झालेल्या बहुतांश रुग्णाची सुटी झाल्यामुळे प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांनी सुस्कारा सोडला . तालुक्यात भगर विषबाधा प्रकरणात पोलिसांनी दहा विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले . १ ९ ६ जणांना भगरीमुळे विषबाधा झाल्याने तहसीलदार राहुल गायकवाड़ यांनी अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्तांसह पोलिसांना विक्रेत्याकडील उपवासाच्या भगरीचे साठे जप्त करून त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदवण्याचे पत्र जारी केले होते . मात्र , अन्न व औषध विभागाचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सामूहिकपणे कारवाई करण्याऐवजी दोन्ही यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे कारवाई करण्यात आली