जवळा बुद्रुक येथे सरपंच उपसरपंच यांची निवड कार्यक्रमाचे आयोजन.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यातील जवळा बुद्रुक या ठिकाणी आज दिनांक 30 सप्टेंबर वार शुक्रवारी रोजी सरपंच व उपसरपंच यांची निवड कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी सरपंच पदी अश्विनीताई साहेबराव शिंदे तर उपसरपंच पदी रामेश्वर इंगोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून नूतन सरपंच व उपसरपंच यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला आहे तर यावेळी उपस्थित मान्यवर हरिचंद्र शिंदे तसेच रामरतन शिंदे यांच्या नेतृत्वात  निवडीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता