*जनता न्यूज चॅनल प्रतिनिधी माबुद खान*
जिंतूर तालुक्यातील मौजे वरुड (नृसिंह) ग्राम पंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री. के.एन.खाडे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी झालेल्या निलंबनाच्या कार्यवाही विरोधात आज जिंतूर पंचायत समिती कार्यालयावर गटविकास अधिकारी यांच्या विरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शरद चव्हाण आणि युवा जिल्हाध्यक्ष प्रितम वाकळे यांच्या नेतृत्वाखाली "जवाब दो" आंदोलन करण्यात आले, यावेळी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थिताना मराठवाडा युवाध्यक्ष किरण घोंगडे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की
ग्रामविकास अधिकारी श्री.के.एन.खाडे यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई रद्द करून जिंतूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यावर एट्रोसिटी कायद्यानसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंदोलन करून घोषणाबाजी लावण्यात आली होती या घोषणामध्ये असे म्हटले की जातीवादी पंचायत समिती गटविकास अधिकारी करायचं काय खाली मुंडका वरी पाय, बीजेपी सरकारच्या करायचं काय खाली मुंडका वरी पाय, देत कसे नाही घेतले शिवाय राहत नाही, अनेक घोषणाबाजी लावून जवाब दो आंदोलन संपन्न झाले