पैठण : पैठण शहरात प्रथमच भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी आयोजित केलेल्या प्रतिष्ठान रास दांडिया 2022 च्या निमित्ताने शहरातील श्रीनाथ हायस्कूल पैठण येथे बुधवार दि.28 रोजी "चला हवा येऊ द्या" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी पैठण शहरातील महिलांसह,पुरुष, युवक,युवती यांनी प्रचंड प्रतिसाद देत भर पावसात कार्यक्रम बघितला.यावर्षी पहिल्यांदाच शहरात नवरात्रौत्सवात प्रतिष्ठान रास दांडिया 2022 या कार्यक्रमाचे आयोजक भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी "चला हवा येऊ द्या"भाऊ कदम प्रस्तुत हा विनोदी हास्य प्रेक्षकांना पोट धरून हसविणारा कार्यक्रम बघण्यासाठी महिलांसह पुरूष,तरुणांनी मोठी गर्दी केली होती.रास दांडिया कार्यक्रमाचे काही दिवस राखीव आहेत.या कार्यक्रमास भोकरदनचे आमदार संतोष दानवे,माजी राज्यमंत्री अनिल पटेल,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे,डॉ. जयंत जोशी,किशोर चव्हाण, डॉ. विष्णू बाबर,डॉ. राका,प्रा.संतोष गव्हाणे,तुषार पाटील,विकास पहाडे,लक्ष्मण औटे,समीर शुक्ल,वैभव पोहेकर,रुपेश जोशी अदि उपस्थित होते. "चला हवा येऊ द्या" मधील भाऊ कदम,श्रेया बुगडे,कुशल बद्रिके,अंकुश वाढवे,स्नेहल सिंदम यांनी विविध प्रात्यक्षिके दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली तर सायंकाळी कार्यक्रम प्रसंगी झालेल्या जोरदार पावसात सुद्धा प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला  

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं