गुहागर : महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका गुहागर यांच्या मार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व माऊली ग्रीन आर्मी गरुडा एरोसस्प्रेस प्रा. लिमिटेड यांच्या जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण नुकतेच आबलोली येथील शेतकरी (बागायतदार) सचिन बाईत यांच्या बागेमध्ये द्रोण द्वारे झाडावर फवारणी प्रशिक्षण व यंत्राची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना गरुडा एरोसस्प्रेस प्रा. लि. कंपनी चे अधिकारी श्री. सानप सर व त्यांचे सहकारी उपस्थित ग्रामस्थांना माहिती दिली. त्यावेळी उपस्थित बागायतदार श्री. सचिन बाईत, श्री. विलास गुरव, सडे जांभारीचे सरपंच श्री अंकुश माटल, श्री. अप्पा कदम, श्री. महेंद्र कदम, श्री. स्वप्निल सुर्वे, श्री. सचिन सावंत, श्री. शाम गडदे, श्री. रविन्द्र गडदे, श्री. शरद सुर्वे, सौ. स्नेहल बाईत, श्री. शैलेश नार्वेकर, श्री. संदीप ठोंबरे, श्री. आशिर्वाद बारस्कर, श्री. हेमंत गुरव, श्री रजत बाईत, श्री. संतोष माटल, श्री. स्वप्निल सावंत, श्री. संतोष गुरव, श्री. अमोल पवार, श्री. राजेंद्र पवार, श्री. संदेश सुर्वे, श्री. सिद्धेश रहाटे, श्री. संदेश पवार, श्री. पिंटू निमुणकर आदी शेतकरी उपस्थित होते. आयोजक कृषी अधिकारी तालुका गुहागर, श्रीमती बि.पी. यादव, श्री. यू. सी स्वामी, श्री के. डि. देमुंडे. श्री. एस एस श्री धायगुडे, कृषी सहाय्यक श्री व्ही. बाजकर आदी उपस्थित होते.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं