औरंगाबाद :- (दीपक परेराव)कनिष्ठ अभियंता सहकारी पतसंस्था मराठवाडा मु.औरंगाबाद औरंगाबाद चे अध्यक्ष इंजि.जयवंतराव गायकवाड यांची पगारदार सहकारी पतसंस्थांच्या फेडरेशनचे संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पगारदार नोकरांच्या पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष इंजि.विजय मंगळे यांनी नुकतीच इंजि.जयवंतराव गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.
राज्यातील पगारदार नोकरांच्या पतसंस्थेचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडून घेणे,स्थानिक पातळीवर असलेल्या अडचणी सोडविणे या करिता या फेडरेशनची नोंदणी केलेली असून त्याचे मुख्यालय धुळे येथे आहे.या फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष इंजि.विजय मंगळे हे असून ते राज्यातील पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्याकरिता कायम प्रयत्न करत असतात.भविष्यात मराठवाडय़ातील पतसंस्थाना सभासद करून, फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे मनोदय नवनियुक्त संचालक इंजि.जयवंतराव गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.