पैठण : होनोबाचीवाडी हे गाव आडुळपासून जवळपास 8किलोमीटर अंतरावर आहे.आणि या गावाला मुख्य बाजारपेठ आडुळ येत असुन येथील नागरिकांना दळणवळणाचे कायमस्वरूपी दुसरे साधन काही नाही.शेतकऱ्यांना भाजीपाला, शेतमाल व तसेच शालेय विद्यार्थ्यांची समस्या,आजारी अथवा वयोवृद्ध,दिव्यांग,तसेच गरोदर मातांना दवाखान्यात जाण्यासाठी वाहनांची समस्या निर्माण होते.येथील नागरिकांसह शेतकरी, शालेय विद्यार्थी यांची गैरसोय होऊ नये यासाठी होनोबाचीवाडी येथे बस सुरू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता तथा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस गजानंद बोहरा यांनी दि.29 सप्टेंबर 2022 रोजी एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे व विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,होनोबाचीवाडी हे गाव ग्रुप ग्रामपंचायत गेवराई बु.अंतर्गत येत असुन येथील शेतकरी, कामगार,यांना बाजाराला व बँकेत येण्या जाण्यासाठी समस्या निर्माण होऊन त्यांची गैरसोय होत आहे.अशा अनेक वाहतुकीच्या समस्या आहेत.या करिता गजानंद बोहरा यांनी एसटी बसची सेवा सुरू करावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे.संबंधीत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेऊन आडुळ, गेवराई बु.मार्गे होनोबाचीवाडी येथे दररोज सकाळी 9 व संध्याकाळी 4 वाजता अशा दोन वेळा बसची सेवा सुरू करावी आणि जनतेची समस्या दूर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता गजानंद बोहरा यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.