संगमेश्वर : भारताचे विकासपुरुष, कर्तृत्ववान पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांचा ७२ वा वाढदिवस देशभर सेवाकार्य करून साजरा केला जात आहे. 'शिवभावे जीवसेवा' करण्याचा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. यालाच अनुसरून भाजपा कार्यकर्ते व मोदीप्रेमी संस्था विविध प्रकारे सामाजिक कार्यक्रम राबवित आहेत.
भाजपा रत्नागिरी द. चे जिल्हा उपाध्यक्ष श्री. हरीभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोदी शासनाने कोणत्या योजना राबविल्या आहेत याबाबत मार्गदर्शन व शालेय साहित्याचे वाटप करण्यासाठी माध्यमिक विद्यालय सोनवडे, संगमेश्वर येथे वह्या व दप्तर वाटप करण्यात आले. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना सेवेचे महत्त्व व सामाजिक दृष्टीने आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भारताचा आदर्श नागरिक घडविण्याची जबाबदारी शाळेतील शिक्षक उत्तमरित्या पार पाडत असल्याबाबत हरीभाई यांनी समाधान व्यक्त केले. व आवश्यकता पडेल अशावेळी सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासित केले.
यावेळी तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताठरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अनुप प्रसादे, श्री. गोविंद भिडे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. कोमलताई रहाटे, सौ. अपर्णाताई भिडे, शहराध्यक्ष श्री. दिपक वेल्हाळ, संस्थेचे संचालक श्री. शंकर धामणे, विभाग अध्यक्ष श्री.प्रकाश गमरे, शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित उपस्थित होते.सौ.मोहिते मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पंतप्रधान मोदीजींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेत सहृदय कार्यक्रम राबविल्याबद्दल शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. मेंगाळ सर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.