डॉ. अनिल बारकुल सर यांचा व्यासंगी लेखक

प्रत्येकजन प्रत्येक गोष्ट पाहू, डोळ्यात साठवू आणि अनुभवू शकत नाही.. काही क्षण डोळ्याने अनुभवावे लागतात.. काहींमध्ये वाचून, बोलून, ऐकून अनुभूतीचा आनंद घ्यावा लागतो... काही लेखकांचे लेखन ईतके सहज, सुंदर, प्रासंगीक आणि आशय- संदर्भपुर्ण असते की, ते वाचल्यानंतर ‘प्रत्यक्षाहुनी अधिक अनुभूतीचा आनंद मिळतो... आपण प्रत्यक्ष पाहुन जे डोळ्यात साठवू शकत नाहीत, ते एखाद्या पुस्तकात वाचून अनुभूतीचा आनंद अधिक घेऊ शकतो... मंगळवारी (दि.27) औरंगाबाद- बीड प्रवासात डॉ. अनिल बारकुल सर यांचे ‘काशिधाम’ पुस्तक वाचले... कधी काशिला गेलो नाही, तिथले घाट पाहीले पाहीले नाही... ते कधी पाहील की नाही याची कल्पना नाही... परंतू डॉ. बारकुल सरांचे ‘काशीधाम’ वाचत असताना मी वाराणसीच्या संथ वाहणार्‍या गंगेत नावेत बसलो आहे... हळूवारपणे चालणार्‍या नावेतून एक- एक घाट डोळ्याने न्याहाळत आहे... त्यांना डोळे भरून पहात आहे... त्यांची वैशिष्ट्ये, ईतिहास, वेळोवेळी झालेले जिर्नोध्दार र्‍हदयाच्या एका कप्प्यात चिरस्मरयी आठवण म्हणून साठवून ठेतवत आहे... अशी अनुभूती आली... प्रत्यक्ष अनुभवापेक्षा अनुभूती मोठी असते, असे कुठेतरी वाचले होते... त्याचा प्रत्यक्ष अनुभव ‘काशीधाम’ वाचत असताना मला आला... किती सुक्ष- बारीक निरिक्षणे, प्रत्येक घाटाचे वैशिष्ट्य, पौराणीक महत्व, कोणत्या काळखंडात कोणी जिर्नोध्दार केला... पुढे आणखी कोणी योगदान दिले.. याची इंत्यभूत माहिती बारकुल सर यांनी ‘काशिधाम’ ग्रंथात मांडली आहे... वारंवार परकीय अतिक्रमणे होऊनही राजमाता अहिल्यादेवी, शिंदे, होळकर, भोसले, पेशवे अशी मराठा सम्राज्ये, राजा मानसिंह, बलदेव बिर्ला, राजा दिग्पतीया, बाळाबाई शितोळे, अनेक संस्थानिक, विविध राज्यातील व्यापारी, जगद्गुरू एवढेच नव्हे तर सैनिक, विश्‍वस्त यांनी काशी- वाराणसीच्या घाटांचा जिर्नोध्दार आणि पुर्णनिर्माण केले... हिंदु धर्माचे जगातील सर्वाधिक महत्वाचे ठिकाण असलेल्या काशीचे महात्म्य कमी होणार नाही, याची काळजी त्यांनी प्रत्येक कालखंडात घेतली... यासाठी त्यांना काय कष्ट घ्यावे लागले असतील? किती धनसंपदा, रयतेची मानसे कामी आली असतील याची कल्पना करवत नाही... हिरिश्‍चंद्र घाटापासून राजा घाट, भोसले घाट, दुर्गा घाट, लाल घाट आणि हनुमान गढी, नया घाट, आदी केशव घाट, प्रभू घाट, छेदीलाल जैन घाट, दशामेश्‍वर घाट, सारनाथ स्तुप याची माहिती ‘काशिधाम’ पुस्तकात वाचत असताना प्रत्यक्षाहुनी अभुभूतीचा आनंद अधिक होतो... प्रत्यक्ष काशीदर्शन घडवणार्‍या डॉ. अनिल बारकुल सर यांचे आभार कसे मानावेत, असा प्रश्‍न प्रत्येक घाटाची माहिती वाचत असताना

मला पडत होता...  

हिंदु धर्माचे पवित्र स्थळ असलेल्या काशी आणि विश्‍वेश्‍वराचे दर्शन हजारो लोकांनी घेतले आहे... गावा- गावात दर्शन घेतल्याचे सांगणारे लोक आहेत.. मात्र एवढी विस्तृत, ऐतिहासिक संदर्भ, पौराणिक कथा, कोणत्या कालखंडात कोणी जिर्नोध्दार केला याचे संदर्भ देणारी एकत्रीत माहिती कुठेही नाही...

काशीधाम ग्रंथात हरिश्‍चंद्र घाटाचा पौराणिक संदर्भ आणि आजचे महत्व विशद करताना या घाटावर फाल्गुन महिन्यात रंगोत्सव आणि होळी खेळली जाते... लाली घाटाचे पक्के बांधकाम विजयनगरचे राजे यांनी 1890 मध्ये केले... चौकी घाटावर इंग्रज काळात पोलिसांची चौकी होती, म्हणून चौकी घाट नाव पडले.. क्षेमेश्‍वर घाटाचे पक्के बांधकाम कुमारस्वामी मठाणे केले... या घाटाचा वापर गौड (भुजा) जातीचे लोक धार्मिक क्रियेसाठी करतात... मानसरोवर घाटाची निर्मिती राज्यस्थानातील राजा मानसिंह यांनी केली. प्रसिध्द साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांच्या गाजलेल्या नाट्याचे सादरीकर या घाटावर झाले... राजा घाट बाजीराव पेशवे यांनी 1720 मध्ये बांधला... अमृत पेशव्यांना इंग्रजांनी वाराणसीत स्थानबध्द केले असताना त्यांनी घाट तर बांधलाच मात्र विनायकेश्‍वर, अमृतेश्‍वर, नारायणेश्‍वर, गंगेश्‍वर ही मंदीरेही बांधली. बीहारच्या पैलवान बबुआ यांनी पाण्डेय घाट बांधला. त्या ठिकाणी कुस्तीचा आखाडा तयार केला. बीहारचा राजा दिग्पतीया याने 1830 मध्ये दिग्पतीया घाट बांधला. पुढे उदयपुरच्या राजाने या घाटाचा विस्तार केला. प्रसिध्द शहनाईवादक तथा भारतरत्न बिसमिल्ला खान आणि वाराणसीचे अतुट नाते होते. ते गंगेत स्नान करून मश्जिदीत नमाज पढायला जात अन् बालाजी मंदीरात बसून रियाज करत असत... उदयपुरचे राणा जगजितसिंग यांनी 1670 मध्ये राणा महल घाट बांधला... नागपुरचे श्रीधर नायायण मुन्शी यांनी घाट व एक भव्य महाल बांधला. याला पुढे मुन्शी घाट नाव पडले. दरम्यान पुढे कामेश्‍वरसिंग गौतम बहादुर यांनी हा घाट विकत घेऊन छान महाल व घाट बांधला. या घाटाला दरभंगा घाट नाव पडले. पुढे 1994 मध्ये क्लार्क हॉटेल ग्रुपने हा घाट विकत घेऊन फाईवस्टार हॉटेल उभारले.

राजमाता पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी यांचे कार्य तर अद्वितीय असेच आहे... त्यांनी वाराणसीतील अनेक घाटांचा जिर्णोध्दार केला.. त्यांच्या नावाने देखील येथे एक घाट असून त्याचे नाव ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी घाट’ असे आहे... 1778 मध्ये अहिल्यादेवी यांनी हा घाट बांधला. येथे अनेक मंदीरे, शिवालये त्यांनी उभारली. आजमेरचे राजे महाराज सवाई मानसिंग यांनी मानमहल हा घाट बांधला. येथे नक्षत्र वेधशाळा आहे. ही नक्षत्र वेधशाळा त्यांचे ज्योतिशी समर्थ जगन्नाथ यांच्या कल्पनेतून साकार झाली. या वेधशाळेत सम्राट यंत्र, लघु सम्राट यंत्र, दक्षिणोत्तर भित्ती यंत्र, नाडी वलय यंत्र, दिशांग व चक्र यंत्र आहे... या महालाची अनेक वैशिष्टे आहेत... मीर घाटाचे निर्माण फौजदार मिर रूस्तूम अलीने केले... येथील विशलाक्षी मंदीर 52 शक्तीपिठांपैकी एक आहे... ललीता घाटाचे निर्माण नेपाळच्या राजाने केले... मोदी घाट नव्याने उद्यास आला असून काशी विश्‍वनाथ कॅरीडोरचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.. व्यापारी रघुनाथ पंडीत, राजमाता अहिल्यादेवी यांनी जिर्नोध्दार केलेला हा घाट दुर्लक्षीत आणि छोट्या- छोट्या गल्ल्यांनी व्यापलेला होता. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ड्रीम प्रोजेक्ट राबवून परिसरातील 5.2 लाख चौरस फुट क्षेत्राचा विकास करण्यात आला आहे. या ठिकाणी सर्व सोय- सुविधा आहेत... रत्नेश्‍वर मंदीर ऐतिहासिक तेवढेच जागतिक वारसा असलेले आहे... ईटलीच्या प्रसिध्द पिसाच्या मनोर्‍याला मागे टाकणारे हे मंदीर आहे.. पिसाच्या मनोर्‍यापेक्षा उंच आणि अधिक झुकलेले आहे.. तरी देखील जागतिक वारशात त्याचा समावेश का नाही? असा सहज प्रश्‍न ‘काशिधाम’चे लेखक डॉ. अनिल बारकुल यांना पडला आहे... मनकर्णिका घाटाचे ऐतिहासिक महत्व आहे... दिवसाचे बारा तास, बारा महिने आणि महिन्यातील 365 दिवस ईथला अग्नी विझत नाही. कायम एकना एक चिथा ईथे जळत असते. यात काही पौराणिक दंतकथांची माहीती पुस्तकात दिली आहे. सिंधीया घाट, संकटा घाट, गंगामहल घाट, भोसले घाटांचा अनादिकाळापासून कोणी जिर्णोध्दार केला... याची माहिती या पुस्तकात आहे... मेहता घाट हा व्यापारी वल्लभराम शाळीग्राम मेहता यांनी खरेदी केला. त्याची दुरूस्ती करून येथे भव्य असे व्हि. एस. मेहता हॉस्पिटल उभारले. येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि उपचार केंद्र सुरू आहे... रामघाटावर शांतीनिकेतन संगीत विद्याल आहे. जटार घाट, राजा ग्वालियर घाट, बालाजी घाट यांची आपापली वेगळी वैशिष्ट्ये आहेत...वाराणसीत 84 घाट आहेत. यापैकी पाच घाट अतिशय पवित्र असून यात अस्सी घाट, दशाश्‍वमेध घाट, आदिकेशव घाट, पंचगंगा घाट, मणिकर्णीका घाट यांचा समावेश आहे... पंचगंगा घाटाची तिन वैशिष्ट्ये आहेत. यात यात कवि तुलसीदास यांनी याच घाटावर त्यांची खास रचना ‘विनायक पत्रिकाम’ लिहीले. तसेच स्वामी रामानंद यांनी याच घाटावर तुलसीदास व ईतर शिष्यांना दिक्षा दिली. या घाटाचा मोठा ईतिहास असून अनेकवेळा परकीय आक्रमणे झाली. घाट उध्वस्त केला.. परंतू रघुनाथ टंडन व अहिल्यादेवींनी घाटाचा पुन्हा जिर्नोध्दार केला. ब्रम्हा घाटाची उभारणी 1742 मध्ये पेशव्यांचे गुरू नारायण दिक्षीत यांनी केली. दुर्गा घाटाचे पुनर्निर्माण नाना फडणवीस यांनी केले. बुंदी परकोटा घाट, शितला घाट व्दितीय, लाल घाट, हनुमान गढी ते तेली समाजाची वस्ती असेलेला तेलीया नाला घाट, नय्या घाट, राजघाट अशा प्रत्येक घाटाच्या निर्माणाची कहाणी ‘काशिधाम’ पुस्तकात आहे... दशाश्‍वमेध घाटावरील आरतीचे वर्णन प्रत्यक्षाहुनी अनुभूतीचा अधिक आनंद देणारे आहे... सारनाथ स्तुप हे महाकारूणी भगवान गौतम बुध्दांनी पहिला धम्म उपदेश केलेले ठिकाण आहे. ज्याला धम्मचक्र प्रवर्तन असे संबोधले जाते. बौध्द धर्मात सारनाथ, बोधगया, लुम्बीनी, कुशीनगर या चार पवित्र स्थानांना सर्वाधिक महत्व आहे. यातीलच सारनाथ हे एक आहे. मोहंमद घोरीने 1017 मध्ये सारनाथ उध्वस्त केले होते. येथील स्तुपाची इंत्यभूत माहिती ‘काशीधाम’ पुस्तकाच्या माध्यामातून डॉ. अनिल बारकुल यांनी दिली आहे... सारनाथ हे केवळ बौध्दच नव्हे तर हिंदु व जैन धर्माचे देखील पवित्र स्थान असल्याचे ‘काशिधाम’ पुस्तकातून कळते... येथे हिंदुंचे सारंगनाथ शिव मंदीर, जैनांचे आकरावे तिर्थकर श्रेयांसनाथ यांचे जन्मस्थळ आहे.. जैन धर्मग्रंथात सिंहपुरम असे या तिर्थक्षेत्राचे वर्णन आहे. येथील अडीच हजार वर्षाचे बांधकाम पाहून बघणारा अचंबीत होतो... काशी विश्‍वनाथ मंदीराचा नरेंद्र मोदी यांनी केलेला जिर्नोध्दार आणि येथील राजमाता अहिल्यादेवी यांचा देखना पुतळा त्यांच्या कार्यकर्तृवापुढे नतमस्तक व्हायला लावणारा आहे.. परकीय आणि स्वकीय आक्रमकांनी अनेकदा काशी विश्‍वेश्‍वर मंदीराची नासधुस केली... परंतू काशीचे महत्व कमी होऊ नये यासाठी अनेक राजे, मराठा संस्थानिक, अहिल्यादेवी, राज्यस्थानचे सिंधीया घराणे, राजा तोडरमल, राजा मानसिंह, महाराजा रणजीतसिंह, राघोजी भोसले (व्दितीय) , नेपाळचे राजे, अनामिक दानशुर, व्यापारी यांनी वेळोवेळी काशी विश्‍वनाथ मंदीराचा जिर्नोध्दार केला...

मंदीराचे वैभव असलेले अद्यात्मीक, धार्मिक स्थल अशी वारणसी (काशी) या शहराची ओळख आहे... केवळ भारतीयांनाच नव्हे तर देश- विदेशातील लोकांनाही काशी- वाराणसीचे आकर्षण आहे... अशा पवित्र, अद्यात्मीक आणि मंदीरांचे गाव, बनारसी साडी, बनारसी पान अशी कितीतरी वैशिष्ट्ये असलेल्या या धार्मिक स्थळाला त्या त्या काळातील महान वक्तींनी जपले... पाडलेले घाट पुन्हा पुन्हा बांधले, त्यांचे पुनर्निर्माण केले... राजमाता अहिल्यादेविंनी वाराणसीची ओळख कोणीच पुससणार नाही, याची हयातभर काळजी घेतली.. अशा या विश्‍वातील हिंदुंचे सर्वात मोठे तिर्थक्षेत्र असलेल्या वाराणसीतील 60 ऐतिहासिक घाटांचे, त्यांच्या निर्माणाचे, पौराणिक कथांचे, अद्यात्मासोबत जपलेल्या सामाजिक भानाचे वर्नण डॉ. अनिल बारकुल यांच्या ‘काशिधाम’ पुस्तकात आहे... प्रत्येकाने वाचावे, संग्रहीत ठेवावे, उत्तरेत काशी व ईतर तिर्थक्षेत्र, देवदर्शन, पर्यटनाला जाताना सोबत ठेवावे असा हा ग्रंथ आहे.. केवळ पुस्तक वाचुन काशी दर्शनाचा आनंद देणारा हा ग्रंथ मराठी साहित्यातील एकमेव आहे, असे म्हटले तर ते अतिशोक्ती ठरणार नाही.

मी कधी काशी- वाराणसीला गेलो नाही, भविष्यात कधी जाईल की नाही, माहित नाही मात्र डॉ. अनिल बारकुल सरांचे ‘काशिधाम’ वाचून मला काशी दर्शनाची अनुभूती आली... ही अनुभूती प्रत्यक्षाहुनी अधिक अनुभूतीचा आनंद देणारी होती... काशीदर्शन घडवल्याबद्दल डॉ. बारकुल सरांचे खुप- खुप धन्यवाद....!

चौकट....

डॉ. अनिल बारकुल यांच्या ‘काशीधाम’ पुस्तकाची प्रस्तावना प्रसिध्द सिनेपटकथा लेखक अरविंद जगताप यांनी लिहीली आहे. लेखक डॉ. बारकुल सर यांचे निरिक्षण, त्यांनी पुस्तकात दिलेली अभ्यासपुर्ण माहीती यांचे कौतुक करत अरविंद जगताप यांनी ‘काशीधाम’ वाचून मराठवाड्यातील घाटांच्या संवर्धनाची प्रेरणा मिळावी, असा आशावाद प्रस्तावनेत व्यक्त केला आहे. असावरी प्रकाशनचे अतुल कुलकर्णी यांनी अतिषय आर्षक पुस्तक तयार केले. संपादक दिलीप खिस्ती सर आणि दै. लोकप्रश्‍नचे आभार पुस्तकात लेखक डॉ मानले आहेत 

शब्द संकलन  पत्रकार बालाजी तोंडे