सोलापूर - देशभरामध्ये आज महागाईचा भस्मासुर वाढला आहे.महागाईने महिलांचे किचेन बजेटसुद्धा पूर्णपणे कोलमडून पडले आहे. सिलेंडरच्या किंमती १ हजार पार गेल्या आहेत.सबसिडीचा कोंडमारा झाला आहे. महिलांसाठी ही सर्वात मोठी महागाईची झळ आहे. त्यामुळे सिलेंडरच्या किंमती कमी करण्यासाठी आपण संसदेत आवाज उठवू, असे आश्वासन संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिले.
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल आणि अर्बन सेलच्यावतीने शहराध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी गुरुवारी सायंकाळी दमानी नगर येथील गडदर्शन समाज मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त बचत गट आणि विविध क्षेत्रातील महिलांसाठी संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी खासदार सुप्रियाताई यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याबरोबरच आत्मनिर्भर बनण्याचा सल्ला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिला.
महागाई, दरवाढ, बेकारी, उद्योग व्यवसायाला प्राधान्य, बचत गटाची समस्या, शिक्षण,वैद्यकीय आदी क्षेत्रातील महिलांनी विचारलेल्या प्रश्नाला प्राधान्य देतानाच याबाबत आपण गांभीर्याने विचार करू असे खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सोलापूरला एकच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. आणखी एक अभियांत्रिकी महाविद्यालय असावे यासाठी आपण जरूर प्रयत्न करू असे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी समीक्षा जाधव या विद्यार्थिनीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी आमचे सरकार सुरू असताना प्रयत्न सुरू होते. परंतु सरकार गेले त्यामुळे विषय मागे पडणार असला तरी सोलापुरात आणखी एका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज ओळखून त्यासाठी आपला पाठपुरावा कायम राहील असे त्यांनी सांगितले. डॉक्टर वैशाली आगावणे, तरुण उद्योजिका शिवाई शेळके,धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मीरा बोंगे, विद्या गायकवाड, अनिता गवळी, उद्योजिका कविता बिडला, युवा कीर्तनकार अरुंधती गवळी तसेच विद्यार्थिनी सृष्टी तोरणे यांनी आपापल्या क्षेत्राशी निगडित असलेले प्रश्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना विचारले. या सर्वांच्या प्रश्नावर खासदार सुळे यांनी समाधानकारक उत्तरे देत या सर्व प्रश्नात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. अवयवदान चळवळीच्या संदर्भात प्रिया पवार यांनी अडचणी सांगितल्या. त्यावरसुद्धा खासदार सुप्रियाताई यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून लक्ष घालण्याचे अभिवचन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार आणि त्यांच्या पत्नी गीताताई पवार यांनी पवार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांचे स्वागत केले.कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश चंद्रकांत पवार यांनी सांगितला. महिलांशी संवाद साधल्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी गडदर्शन कॉलनीतील सत्यनारायण बिडला, श्रीमती शोभा बिडला ,कविता बिडला आणि शैलेश बिडला कुटुंबाने सुरू केलेल्या फूड प्रॉडक्ट कारखान्याला भेट दिली.या ठिकाणी महिलांच्या हाताला काम मिळत असल्याबद्धल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर चंद्रकांत पवार कुटुंबीयांच्यावतीने खासदार सुप्रियाताई यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला. गडदर्शन सोसायटीचे चेअरमन शिवदास चटके सर यांनी आभार मानले .
या कार्यक्रमास नलिनी चंदेले, विद्या शिंदे, सायरा शेख, लता ढेरे, सिया मुलाणी, अनिता गवळी, प्रिया पवार, दीपक राजगे ,सिकंदर गोलंदाज, शिवदास चटके सर, अनिल गायकवाड, श्याम गांगर्डे, सुरेशसिंग पवार, युवराज सलगर, अमर गरड, अजय जगताप ,प्रभाकर मोरे,सूर्यकांत पवार, शंकर काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.