औंढा नागनाथ येथे शासकीय विश्रामगृह येथे मुंबई येथील शिवसेना दसरा मेळावा पूर्वनियोजित आढावा बैठक

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

मुंबई दसरा मेळाव्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून दहा हजार शिवसैनिक जाणार- शिवसेना जि प्र विनायकराव भिसे 

 औंढा नागनाथः-शहरात शिवसेनेची 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे पाटील हे होते .

    यावेळी जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे यांनी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त संख्येने आपल्याला मुबई येथे दसरा मेळाव्यासाठी जायचे आहे. त्याकरिता सर्वांनी आपल्या सर्कल मधून गाड्या काढून सर्व शिवसैनिकांनी हिंगोली या ठिकाणी यायचे तसेच सर्व शिवसैनिकांनी गाड्यावर शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे पोस्टरही लावायचे .या बैठकीत शिवसैनिकांस सुचना दिल्या.

    या बैठकीस जिल्हाप्रमुख संदेश देशमुख,मा.आमदार संतोष टारफे,गोपू पाटील,बाळासाहेब मगर, उपजिल्हाप्रमुख जी डी मुळे हे होते.

 पदाधिकाऱ्यांच्या निवडी त्यामध्ये औंढा तालुका संघटक आनिल शिंदे, उप तालुकाप्रमुख सुरेश राठोड, उप तालुका प्रमुख स्वप्निल पोले, सचिव बालाजी नरोटे, सहसचिव राम सोळंके, पिंपळदरी सर्कलप्रमुख रावसाहेब लेकुळे ,जलालदाभा सर्कल प्रमुख विलास जवादे,येहळेगांव सर्कल प्रमुख संजय चव्हाण, उपसर्कल प्रमुख मुंजा टोम्पे यांची निवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.या बैठकीमध्ये जलालदाभा, पिंपळदरी, काकडदाभा, जामगव्हाण ,टेंभुरदरा, फुलदाभा ,जांबराजापुर,शिंदेवाडी, ढेगज,दुधाळा,गढाळा वाळकी आदी गावातील विनायकराव भिसे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख हिंगोली यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रीय समाज पक्ष तसेच काँग्रेस मधून 150 युवकांचा शिवसेन