विद्यार्थी दशेतच माहितीच्या अधिकाराचा चांगल्या पद्धतीने अभ्यास आणि वापर केला पाहिजे. माहिती अधिकार नागरिकांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवुन देणारा कायदा आहे, असे प्रतिपादन यश कोचिंग क्लासेसचे संचालक तथा जन आंदोलनाचे बीड तालुका उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी केले.

         आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमांमध्ये त्यांनी कुर्ला येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, माहितीचा अधिकार नागरिकांना सहजा सहजी मिळालेला नाही. यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सातत्यपूर्ण लढा दिला. म्हणून हा कायदा आपल्याला मिळालेला आहे.

          आपल्या लहान लहान अडचणी सोडवून घेण्यासाठी या कायद्याचा पुरेपूर वापर करता येतो. त्यामुळे या कायद्याच्या अभ्यास करणे आवश्यक आहे. माहिती अधिकार क्रांतिकारी कायदा असल्याचे देखील त्यांनी म्हंटले.