पाथरी : 

           दिनांक 24/09/22 रोजी पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे पोस्ट ऑफिस रामपुरी खुर्द व ग्रामपंचायत ढालेगाव यांचा वतीने ढालेगाव येथे पोस्टल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

       पोस्ट ऑफिस तर्फे अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या योजनाचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक घरी प्रत्येक नागरिकांना व्हावा या उदात्त हेतूने पोस्टा मार्फत मेळाव्याचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने ढालेगाव येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदरील कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ढालेगाव चे सरपंच विक्रम शिंदे हे होते.तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून देशमाने साहेब(ASPHQ )परभणी , चव्हाण साहेब व महंत पद्मनाभानंद गिरी हे लाभले .

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक वऱ्हाडे साहेब (SPM)पाथरी यांनी केले.

यावेळी श्री देशमाने सर यांनी ग्रामीण टपाल जीवन विमा सुकन्या समृद्धी योजना एक्सीडेंटल पॉलिसी एसबीआरडी पोस्टाच्या सर्व योजना बद्दल सविस्तर माहिती दिली तरी सर्व या मेळाव्याला ढालेगाव येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून पोस्टाच्या योजनाची माहिती घेतली तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री उत्तमराव शिंदे व विठ्ठलराव शिंदे यांनी घरातील सर्व कुटुंबांचे सदस्यांचे टाटा ए आय जी एक्सीडेंटल पॉलिसी काढून घेतले.व गावातील नागरिकांना पोस्टाच्या योजनाचा लाभ घ्यावा म्हणून आवाहन केले 

      या मेळाव्याला महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.साई महिला ग्रामसंघ ढालेगाव च्या पदाधिकारी तेजस्विनी भदर्गे (CRP), प्रियंका शिंदे (FLCRP) यांनी आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

       हा मेळावा यशस्वी करण्यासाठी दीपक गिराम सर BPM नाथरा, किरण सवळे सर BPM पाथरगव्हाण, वैजेनाथ रोकडे सर BPM वडी , नामदेव मुळे सर BPM गुंज, रवींद्र रनेर सर BPM रामपुरी, गंगाधर भदर्गे ABPM रामपुरी यांचे विशेष सहकार्य लाभले.