कन्नड : येथील ग्रामीण रुग्णालयात दोनपैकी एक रुग्णवाहिका शोभेची वस्तू असल्याचा प्रत्यय मंगळवारी भगरीतून विषबाधा झालेले रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना आला . भगरीतून विषबाधा झाल्याने १२ महिलांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले . त्यापैकी आठ महिलांची प्रकृती अचानक खालावल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यासाठी दोन रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका उपलब्ध झाली . परंतु , एक रुग्ण रुग्णवाहिका उभी असतानादेखील रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारामुळे काही रुग्णांना खासगी वाहनाने औरंगाबाद येथे उपचारासाठी हलवावे लागले . परंतु , उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत अधिक वेळ गेला . त्यामुळे रुग्णवाहिका केवळ शोभेसाठीच आहे काय , असा प्रश्न या वेळी नागरिकांनी उपस्थित केला . मंगळवारी सकाळपासून शहरातील अनेक खासगी रुग्णालयांत तालुकाभरातून भगरीतून विषबाधा झालेले रुग्ण उपचार घेत होते . विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या १५० वर जाण्याची शक्यता आहे
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं