माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेचा शुभारंभ डॉक्टर गौतम देसाई वैद्यकीय अधीक्षक , डॉक्टर शुभम शेळके वैद्यकीय अधिकारी, एस एस मार्कंडे, रंजना माने मॅडम, अस्मिता लंबाडे, खूलूदमकसूद नजिरी हे अधिकारी उपस्थित होत .

   श्रीवर्धन मध्ये बहुसंख्य लोकांनी उपस्थित राहून या योजनेचा मूळ समजून घेतले.

   या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 54 प्राथमिक आरोग्य केंद्रात, 280 आरोग्य केंद्रात 2 भरारी पथके यांच्यासह इतर आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत 21 वर्षावरील सर्व महिला माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा , सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा, या व इतर आरोग्य सेवासुविधा प्रत्येक गावात एक दिवस आरोग्य व पोषण दिनाच्या दिवशी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

     जिल्ह्यातील व तालुक्यात जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी केले आहे.