श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज (आनंदवाडी) येथील समर्थ गणेश यादव या पाचवीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांला स्विफ्ट डिझायर गाडीमधून पळवून नेण्याचा डाव असताना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा डाव उढळला असून नागरिकांनी या विद्यार्थ्याला पळून नेणाऱ्या दोघांची गाडी अडवत बेदम चोप देऊन श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या दोघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नासिर गुलाब पठाण वय(२८)रा, काष्टी.ता.श्रीगोंदा व हरिभाऊ दत्तू वाळुंज वय (२७) वर्षे रा. पिंपळगाव तुर्क, ता.पारनेर असे दोन अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.या
याबाबत सविस्तर वृत्त असे कि तालुक्यातील अजनुज (आनंदवाडी) येथील समर्थ गणेश यादव वय ११ वर्षे हा रयत शिक्षण संस्थेच्या काष्टी येथील जनता विद्यालयात इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असून बुधवारी सकाळी ९:३० वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी अजनुज चौकात येऊन थांबला असता त्याचेजवळ बिना नंबरची स्विफ्ट डिझायर गाडी येऊन थांबत काष्टी येथील नासिर गुलाब पठाण याने गाडीत बस तुझ्या पप्पांचे आम्ही मित्र आहोत असे म्हणून गाडीत बसवत आणखी दोघा अनोळखीना गाडीत बसून त्यांना गणेशा व माळवाडी येथे सोडले आणि समर्थ याला पुढे घेऊन जात असताना खरातवाडी येथे हरिभाऊ दत्तू वाळुंज याने गाडीत असलेल्या चाकू दाखवून आरडा ओरडा केला तर चाकू पोटात खुपसील असा सज्जड दम दिला. त्यानंतर पुढे मोठा खड्ड्यांमुळे गाडीचे स्पीड कमी झाल्याने समर्थ यादव याने गाडीतून उडी टाकली व रस्त्या लगत असलेल्या अशोक वाघमोडे यांच्या घरी जाऊन माझ्या वडिलांना फोन करत आनंदवाडी येथील महेंद्र गिरमकर यांना गाडी बाबत माहीती दिल्याने काष्टी सिद्धटेक रोडवरील आनंदवाडी फाटा फाट्यावर महेंद्र गिरमकर आणि दहा ते पंधरा सहकाऱ्यांनी गाडी अडवली व चौकशी केली असता सदर गाडीत मद्य धुंद अवस्थेत असलेल्या तरुणांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. अधिक चौकशी करत गाडीची तपासणी केली असता गाडीमधे चाकू, दारूच्या बाटल्या, ग्लास, चकणा, व सुमारे आठ ते दहा वेगवेगळ्या प्रकारच्या नंबरप्लेटा व महाराष्ट्र शासन नाव असलेल्या पाट्या दोन पाट्या मिळून आल्याने ग्रामस्थांनी दोघांना बेदम चोप देत नासिर गुलाब पठाण वय(२८)रा, काष्टी.ता.श्रीगोंदा व हरिभाऊ दत्तू वाळुंज वय (२७) वर्षे रा. पिंपळगाव तुर्क, ता.पारनेर या दोघांना श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलाचे वडील गणेश विठ्ठल यादव यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करीत आहेत.
एसपींच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
राज्यभरात मुले पळविणारी टोळी आल्याच्या संशयावरून मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या निर्देशानुसार पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर जिल्ह्यात अशा प्रकारे कोणी संशयित व्यक्ती आढळून आल्यास जमावाने त्यांना मारहाण न करता पकडून पोलिसांच्या स्वाधीन करावे, असे आवाहन नुकतेच केलेले आहे. परंतु अशा वेळी जमाव लगेच कायदा हातात घेतो, असा अनुभव आहे. आजही आनंदवाडीत असाच प्रकार घडला. जमावाच्या तावडीतून ते दोघेजण पोलिस आल्याने वाचले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
शालेय विद्यार्थ्यांना पळुन नेणारी टोळी श्रीगोंदा तालुक्यासह विविध ठिकाणी सक्रिय झाल्याचे वास्तव असो किंवा अफवा असो पंरतु पालक व शालेय विद्यार्थी ,शाळाचे मुख्याध्यापक ,शिक्षक यांनी सतर्क राहीले पाहिजे ,शालेय लहान विद्यार्थ्यांनी पालक सोडुन कोणाच्याच गाडीवर किंवा ईतर वाहाणांत बसले नाही पाहिजे, कुठे संशयित व्यक्ती आढळुन आली किंवा वास्तव मुल पळुन नेणारी टोळी आढळुन आली तर नागरीकांनी कायदा हातात न घेता पोलिस स्टेशनशी संपर्क करत माहिती दिली पाहिजे