गोगरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात २८ सप्टेंबर रोजी 'छत्रपती फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, वतीने योग प्राणायाम शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आपल्या स्वास्थाविषयीआरोग्या विषयी जागरुकता निर्माण व्हावी व त्यांचा शारीरिक मानसिक बौध्दिक विकास व्हावा, या उद्देशाने एक दिवसीय भव्य दिव्य योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला योग गुरु रामदेव बाबा यांचे शिष्य योगशिक्षक राजू डांगे यांनी वेगवेगळ्या यौगिक क्रिया ,योगासने, सूर्यनमस्कार सोबतच प्राणायामाचे सुद्धा महत्त्व सांगितले. त्यांनी बीपी ,शुगर ,अस्थमा ,कोलेस्ट्रॉल ,लिव्हर, किडनी, थायरॉईड एवढेच नव्हे तर कॅन्सर पासून तर कोरोणासारख्या असाध्य आजारावर मात करण्यासाठी आज आपल्याकडे एकमेव जर पर्याय कुठला असेल तर तो म्हणजे योग प्राणायाम. आज समाजातील प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्यातरी आजाराशी रोगाशी जुळलेला असून रोगग्रस्त व्याधीग्रस्त पिडाग्रस्त झालेला आपल्याला दिसतो आहे, त्यामुळे या सर्व व्याधीपासून मुक्त होण्यासाठी सर्वांनी योगप्राणायामाचा अंगीकार करण्याची गरज आहे, या शिबिराला उपस्थित मान्यवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक निघोट सर, छत्रपती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश नारायणराव बोथे , ढोकणे सर ,बकाने सर, चाफे सर ,माकोडे सर, मवन सर व शाळेतील सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक मंडळी उपस्थित होते.