माऊली नगरचा रस्त्या करून वचनपुर्ती केल्याने आ.सुरेश धस यांचे बँनर लावून मतदाराने मानले आभार
पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा नगरपंचायत अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक १ व प्रभाग ६ मधील नागरिकांची,महीला भगीनीची,वयोवृद्ध नागरिक व लहान मुलांची रस्त्या अभावी खुप हाल होत होते,गत नगरपंचायतीच्या निवडणूकीत आमदार सुरेश आण्णा धस हे प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक ६ मध्ये प्रचारादरम्यान गेले असता या भागातील महिला भगिनींनी व नागरिकांनी त्यांच्या समोर रस्त्याचा गहन प्रश्न मांडला असता आमदार सुरेश आण्णा धस यांनी त्यांना शब्द दिला की, नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर दिड महिन्यात तुमचा रस्ता करून देतो माऊली नगरचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे सिमेंट काॅंक्रेट रस्ता होता म्हणून निवडणूक झाल्या की आमदार सुरेश आण्णा धस यांनी रस्त्याच्या कामासाठी भरीव निधी टाकून रस्ता एकदम टकाटक करून दिल्याने माऊली नगर येथील सुज्ञ नागरिकांनी आ.धस यांचे आभाराचे डीजीटल बॅनर लावुन जाहीर आभार व्यक्त केले असून या झालेल्या रस्त्याचे काही तथाकथित पत्रकार व काही तथाकथित समाजसेवक यांनी फुकटचे श्रेय घेवु नये असे प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक किशोर अडागळे,प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक रोहीदास गिते व नगरसेवक आसिफ सौदागर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले असून पाटोदा शहरातील जवळपास दोन ते तीन हजार लोक वस्ती असलेल्या माऊली नगर मध्ये जाण्यासाठी रस्ताच नव्हता त्यामुळे रस्ताच नसल्यामुळे या भागातील महिला भगिनी,नागरिक, वयोवृद्ध व लहान मुलांचे रस्त्या अभावी खुप हाल होत होते.पावसाळ्यात तर भागातील नागरिकांचे रस्त्या अभावी खुप हाल होत होते.नगरपंचायतची निवडणूक लागल्यानंतर या प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक ६ माऊली नगर भागात प्रभाग क्रमांक १ चे उमेदवार किशोर अडागळे व प्रभाग क्रमांक ६ चे उमेदवार रोहीदास गिते यांच्या प्रचारासाठी आमदार सुरेश आण्णा धस व उमेदवार, पदाधिकारी कार्यकर्ते गेले असता तेथील महीला भगीनींनी व नागरिकांनी आ.धस यांच्या समोर रस्त्याचा प्रश्न मांडला. आमचा रस्ता त्वरित करून द्यावा अशी मागणी मांडली असता आमदार सुरेश आण्णा धस यांनी नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर लगेचच दिड दोन महिन्यांत तुमचा सिमेंट काॅंक्रेट रस्ता करून देतो अशा प्रकारचे आश्वासन दिले व लगेचच निवडणूक झाल्यानंतर या माऊली नगर भागाचा सिमेंट काॅंक्रेट रस्ता करून दिल्या मुळे हा रस्ता फक्त आणि फक्त आमदार सुरेश आण्णा धस यांच्या मुळेच झाला असुन इतर तथाकथित काही पत्रकार व तथाकथित काही समाजसेवक यांनी या झालेल्या सिमेंट काॅंक्रेट रस्त्याचे फुकटचे श्रेय घेवुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नये असे या प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक किशोर अडागळे,प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक रोहीदास गिते व नगरसेवक आसिफ सौदागर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.