पालम 

अमृत महोत्सव फळबाग लागवड शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर व शेतातील बांधावर झाडे लावण्यासाठी शासनाने वेळोवेळी अनेक प्रकारच्या जनजागृती करून शेतकऱ्यांना वृक्ष लागवड करण्यास प्रवृत्त केले त्या अनुषंगाने पालम पंचायत समितीने कार्यारंभ आदेश सुद्धा दिले असून पुढील कारवाई होत नसल्याबाबत पालनचे गटविकास अधिकारी शिसोदे साहेब यांना शेतकऱ्यांनी पुढील कारवाई करण्यासंदर्भात प्रश्न केले असता गटविकास अधिकारी सिसोदे साहेब यांनी वनीकरण खात्याकडे बोट दाखवत दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी घातला सदरील सर्व प्रकरणाकडे शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग तात्या रोकडे यांनी लक्ष घालून शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख माधव कदम यांच्याकडे शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी संदर्भात चर्चा करून या संदर्भात येणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या शिंदे गटातील मंत्री असणारे संदिपान भुमरे यांच्याकडे पाठ पुरावा करून सदरील योजनेतील जीआर मध्ये बदल करून सर्व गट विकास अधिकार गटविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर झाली आहे त्यामुळे पांडुरंग रोकडे तात्या यांच्या प्रयत्नाला यश आले आहे यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त होत आहे