पूल ओलांडताना पुराच्या पाण्यात गेले वाहून ; सुदैवाने सर्वजण बचावले,पहा व्हिडीओ

सोलापूर :- पूल ओलांडताना पाच ग्रामस्थ पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी गावात घडली आहे. पुलावरुन नागरिक वाहून जातानाची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून सुदैवाने ग्रामस्थांच्या मदतीने सर्वजण सुखरूप वाचले असल्याची माहिती समोर आले आहे.

निखिल महादेव कुंभार, पोपट बाबुराव घाडगे, अनुसया पोपट घाडगे, दिलीप ताकभाते आणि प्रविण भारत क्षीरसागर अशी वाचलेल्या नागरिकांची नावे आहेत.

गेल्या चार वर्षांपासून या पुलावरुन पाणी वाहत आहे. अनेक दिवसांपासून पुलाची उंची वाढवून देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. गावकऱ्यांनी तहसीलदार सुनील शेरखाने यांची भेट घेत वारंवार ही मागणी केली. मात्र प्रशासनाने याची दखल न घेतल्याने अखेर दुर्घटना घडली.