सणासुदीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गोरगरिबांना गोल्डन गिफ्ट दिलं आहे असे मत माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले ते आज अकलूज येथे पत्रकारांशी बोलत होते.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घेतला असून ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत देशभरातील रेशनिंगवर प्रति व्यक्ती ५ किलो धान्य मोफत मिळणार असल्याचे आमदार मोहिते पाटील यांनी सांगितले.