माळशिरस तालुक्यातील अकलूज गावचे ग्रामदैवत असणाऱ्या आई अकलाई देवीच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस देवीची विविध रूपात महापूजा करण्यात येते आज देवीची शेषशाही अलंकार युक्त महापूजा करण्यात आले आहे.
मंदिराचे कार्यकारी विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे पुजारी मोहन गुरव व परिवाराच्या वतीने नऊ दिवस देवीची विविध रूपात महापूजा करण्यात येत असते त्याचबरोबर नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.
 
  
  
  
   
  