परभणी,दि.28 (प्रतिनिधी): जिल्ह्यातील सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग क्षेत्रातील निर्यातक्षम उद्योजकांना योग्य मार्गदर्शन व्हावे, तसेच जिल्ह्यातील उद्योगांच्या अडीअडचणी जिल्हा मैत्री कक्षाद्वारे सोडविण्यात याव्यात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात शनिवार, दि. 23 सप्टेंबर रोजी ‘निर्यात प्रचालन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी गोयल बोलत होत्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर, अ.उ.अधिकारी नितीन कोळेकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनिल हट्टेकर, एमएसएमईचे सयुंक्त निर्देशक नरेंद्र इस्टोलकर, सीडीबी प्रबंधक सीमांत पारधी, एमआयडीसीचे डी.एस.इंगळे, कृषि उपसंचालक बी.एस. कच्छवे, सुरेश पारेख, नंदकिशोर बाहेती, डॉ. मो. आयुब, सी.व्य.जाधव आणि जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी. हणबर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या की, जिल्हा उद्योग केंद्र, कृषी विभाग, औद्योगिक महामंडळ सर्वांनी समन्वय साधून जिल्ह्यातील व्यवसायीकांना योग्य ते सहकार्य करुन जास्तीत-जास्त प्रोत्साहन द्यावे. तसेच प्रलंबित प्रकरणांची यादी संबंधीत विभागाकडुन घेवून तयार करण्यात यावी. उप विभागीय अधिकारी यांनी एनए व सनदबाबत तात्काळ कार्यवाही संबंधित करावी. परभणी व सेलू येथील नवीन एमआयडीसी उभारणीसाठी जमीन अधिग्रहणाच्या दरामध्ये तफावत असून, एक अंतीम संधी देवून शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन योग्य निर्णय घेण्यात येईल. तसेच जिल्ह्यामध्ये पर्यायी एमआयडीसी जागेबाबत शोध घेणेबाबत संबंधीतांना सूचीत करण्यात आले आहे. विभागीय अधिकारी, एमआयडीसी नांदेड यांना याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचीत केले आहे. बांधकामाचे नकाशे मंजुरी बाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना ही सहाय्यक संचालक, नगर रचना, परभणी यांना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच यावेळी अतिरीक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी मैत्री कक्ष नियमित करुन महिन्यातुन एक दिवस आढावा सभा घेण्यात यावी असे सांगितले. श्री. इस्टोलकर, सहसंचालक, एमएसएमई, औरंगाबाद यांनी सिंगल विंडो एमएसएमई अॅक्ट बाबत यावेळी माहिती दिली. श्री. सीमंत पारधी, प्रबंधक, सिडबी औरंगाबाद यांनी सिडबीच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. श्री.डी. एस. इंगळे, प्रा.अधिकारी, मऔविम. नांदेड यांनी परभणी जिल्ह्यातील एमआयडीसी सद्यस्थितीबाबत सादरीकरण केले. त्यानंतर श्री. सुरेश पारेख यांनी ‘निर्यात प्रक्रिया आणि दस्तऐवजीकरण नियम, नियम, प्रोत्साहन’ आणि ‘निर्यात सुलभता आणि सरकार निर्यात प्रोत्साहनासाठी भारत समर्थन योजना’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक महाव्यवस्थापक पी.डी.हणबर, यांनी केले. तसेच यावेळी कार्यशाळेत यावेळी श्री.शाम धुत यांनी साप्रोयो 2019, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजना, महिला धोरण प्रोत्साहन योजना याबाबत यावेळी मार्गदर्शन केले. श्री. सुनिल हटटेकर यांनी ‘निर्यातीसाठी बँक वित्त’ या विषयावरी माहिती दिली. प्रकल्प संचालक, आत्मा बी. एस. कछवे यांनी कृषि विभागात निर्यातीच्या संधी व चालना याबाबत यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी ईओडीबी व जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांचे सादरीकरणांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी निर्यातदार उद्योजक कोहिनुर रोप्स प्रा.लि.सेलू व रिलायबल अॅग्रो फुड पुर्णा यांनी निर्यातीबाबत आपले अनुभव सांगितले. भेंडी कृषि निर्यातदार पशुपती शेवटे, संतकृपा भाजीपाला उत्पादक गट, शिरपुर प्रमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ओमप्रकाश डागा, अध्यक्ष, जिनिंग प्रेसिंग असोसिएशन, परभणी यांनी उद्योगाबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत जिल्हाधिकारी यांना यावेळी निवेदन दिले. कॉटन क्लस्टर सेलू, श्री. काब्रा यांनी क्लस्टर बाबत अनुभव व्यक्त केले. उद्योजकांच्या अडीअडचणी बाबत उपस्थित तज्ज्ञांचे उपयोजना चर्चा घडविण्यात आली. कार्यशाळेचे सुत्रसंचालन, प्र.व्यवस्थापक, रविंद्र पत्की यांनी केले तर जि.उ.के.चे व्यवस्थापक सुरेश पवार, यांनी आभार मानले. यावेळी कार्यशाळेला मोठ्या संख्येने जिल्ह्यातील उद्योजकांची उपस्थिती होती.