वैजापूर  शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात उपवासादरम्यान भगर खाल्याने
अनेकांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार ता.२७ रोजी सकाळी समोर आला आहे. यातील बरेच रुग्ण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यातआले. तर काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सव्वाशे जणांना भगरीतून विषबाधा झाल्याचे प्रशासनाकडे नोंद करण्यात आली आहे. बुधवारी दुपार पर्यंत रुग्णालयात विषबाधा झालेल्या रुग्णांची भरती सुरू होती. यामुळे रुग्णांचा आकडा आणखीनही वाढणार आहे. नवरात्रीला भाविक सलग नऊ दिवसांचा उपवास पाळतात. उपवासादरम्यान साबुदाणा, भगर आदींचा आहारात वापर केला जातो. यंदाच्या नवरात्रीचा सोमवारी पहिला उपवास होता. यादिवशी उपवासादरम्यान अनेकांनी आहारात भगर खाल्ली. परंतु मध्यरात्रीपासून बऱ्याच जणांना मळमळ, अंगाला थरथरि, चक्कर येणे व अंग गळून गेल्यासारखे होऊ लागले. तर अचानक उलट्या देखील सुरु झाल्या. या उलट्या थांबत नसल्याने जो-तो दवाखाना जवळ करू लागला. भगर खाऊन विषबाधा झाल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात ४४ तर इतर खासगी रुग्णालयात ८१ असे १२५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुधवारी उशिरापर्यंत बाधित  रुग्णालयात दाखल होत होते. यामध्ये महिलां रुग्णाचा मोठ्या संख्येत समावेश आहे. दरम्यान अद्यापपर्यँत एकही रुग्ण दगावला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. भगरेतून अनेकांना विषबाधा झाल्याने तहसिल प्रशासनाने शहर व परिसरातील किराणा विक्रेत्यांना तात्काळ भगर विक्री बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. 

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं