१८ कोटी खर्चुनही राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर चिखलमय ,रखडलेल्या रस्ताकामाच्या निषेधार्थ दूभाजकात बेशरमाची झाडे लावा आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे यांचा पुढाकार 

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

बीड प्रतिनिधी

बीड शहरातुन जाणा-या धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट क्राॅक्रीट रस्त्याचे काम अपुर्णच असुन जालना रोड वरील काकु नाना हाॅस्पिटल ते राषट्रवादी भवन या दरम्यानच्या रस्त्यासाठी जवळपास १८ कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला तरी सुद्धा रस्तेकाम अपुर्णच असुन बाजुचे साईडपट्टे काही ठिकाणी भरलेच नाहीत तर काही ठिकाणी मुरूमाने भरल्याने आता पावसाळ्यात त्याचा चिखल झाला असून रस्त्या वरील वाहने घसरून अपघाताचे प्रमाण वाढले असुन जालना रोडवरील दुभाजकांचे काम अर्धवट असुन दोन रस्त्यांच्या दुभाजकात अद्यापही माती भरलेली असुन आता दबल्याने खड्डे पडलेले आहेत त्यात वाहने अडकुन अपघातात वाढ झाली आहे याविषयी संबधितांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा सुधारणा न केल्याबद्दल बेशरम प्रशासन-ठेकेदाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जालना रोडवरील सेंट एन्स इंग्लिश स्कूल समोरील 

जालना रोडवरील माती भरलेल्या दुभाजकात बेशरमाची झाडे लाऊन बेशरम प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, बालाजी जगतकर कार्याध्यक्ष बीड जिल्हा बाल हक्क संरक्षण संघ, बीड जिल्हा संघटक शेख मुबीन बीडकर आदि सहभागी होते. 

नितिनजी गडकरी,प्रकल्प संचालक अरविंद काळे यांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे 

 आंदोलनानंतर निवेदन निवासी जिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या मार्फत नितिनजी गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री भारत सरकार,प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद अरविंद काळे यांना देण्यात आले असुन संबधित प्रकरणात जबाबदार कंत्राटदार-आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी व उर्वरीत काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.