परभणी(प्रतिनिधी)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संघाने दुहेरी विजेतेपद प्राप्त करत सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

      नुकतीच मानवत येथील के.के.एम. महाविद्यालयात ही स्पर्धा संपन्न झाली. सदरील स्पर्धेत एकूण बारा संघांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालयाच्या मुले-मुली संघाने सलग विजय मिळवत सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. या विजयाने मागील दहा वर्षाची परंपरा कायम ठेवली आहे. मुलांच्या संघात सुरज भुजबळ(कर्णधार), अभिषेक लालपोतु, प्रेम दिघे, वैभव शेटे, प्रशांत खंदारे या खेळाडुंचा समावेश होता. तर मुलींच्या संघात अर्पिता हत्तेकर(कर्णधार),रोहिणी जाधव, पूजा काळे, नेहा परदेशी, बांगर समृद्धी या खेळाडूंचा समावेश होता. विजयी संघास क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.संतोष कोकीळ, प्रा. राजेसाहेब रेंगे तसेच विक्रम हत्तेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

     संघाच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी,उपप्राचार्या डॉ. विजया नांदापूरकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे , गणेश गरड तसेच प्राध्यापक तथा प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.