सोलापूर : - श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर नऊ महिलांना "नारीशक्ती" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार दि ०२ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली.

रंगभवन चौकाजवळील समाजकल्याण केंद्रात हा सोहळा होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आनंदश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ.माधवी रायते, महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन महासंघाचे संचालिका सोनाली जाधव-मस्के, नेत्ररोग तज्ञ डॉ. तन्वंगी जोग ,माजी नगरसेविका सायली जवळकोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्मिता पाटील, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होणार आहेत.   

सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे चौथे वर्षे आहे. नवरात्रीनिमित्त आदिशक्तीच्या नऊ रूपाप्रमाणेच विविध क्षेत्रातील नऊ महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने सन्मान होणार असल्याचे महेश कासट यांनी सांगितले.

या सोहळ्यास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन भारती जवळे, सुजाता सक्करगी, शुभांगी लचके, प्रियंका जाधव, शीला तापडिया, रुपा कुत्ताते, प्रांजली मोहिकार, वंदना आंळगे यानी केले आहे.

या आहेत नारीशक्ती पुरस्काराच्या मानकरी !

सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील (महिला आर्थिक सक्षमीकरण), सोलापूर रेल्वे डीआरएम मुख्य कार्यालय अधीक्षक सविता जाधव (प्रशासकीय), भागाईवाडीच्या माजी सरपंच कविता घोडके-पाटील (ग्रामविकास), ज्वेलरी सल्लागार स्मिता देशपांडे (उद्योजक ), डाँ.सारिका होमकर (वैद्यकीय), रियल इस्टेट कन्सल्टंट अंजली मालाणी-भाटे (व्यवसाय), मासाई चाटला (लघु उद्योग ), ओम इंडरस्ट्रीजच्या प्रोप्राइटर मनिषा डागा (उद्योजक, उत्पादन), सहव्यवस्थापिका लक्ष्मी आरगी ( बँकिंग) आदी नऊ मान्यवर महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.