आपले गावाची निकड काय आहे हे पाहून जर ग्रामविकास आराखडा तयार केला व त्यामध्ये समाजातल्या सर्वांगीण घटकांचा विचार करून प्रामुख्याने बालस्नेही, महिला स्नेही ,सामाजिक सुरक्षा, शिक्षण ,आरोग्य व दळणवळणाची साधने याचा संपूर्ण विचार करून जर गावचा विकास आराखडा केला तर तो शाश्वत ठरतो. त्यामुळे आपले स् गाव स्वराज्यातून सुराज्याकडे परिवर्तित होण्यासाठी मदत होते आणि हीच संकल्पना हेच प्रशिक्षण या प्रशिक्षणातून घेऊन गावाचा विकासाचा आराखडा इतर गावांपेक्षा वेगळे कसे करता येईल याचे विचार करून आपला आराखडा तयार करावा असे प्रतिपादन दिलीप स्वामी यांनी पंचायत समिती दक्षिण सोलापूर मार्फत आयोजित सरपंच ,ग्रामसेवक व अधिकारी कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी केले .पंचायत समिती दक्षिण सोलापूरच्या वतीने शांतीसागर मंगल कार्यालय येथे दक्षिण सोलापूर मधील सर्व सरपंच ,ग्रामसेवक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत प्रशिक्षणाचे दीप प्रज्वलनाने श्री दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी यशदाचे प्रशिक्षक महादेव बेळे, शिवाजी पवार, राजेंद्र वार्गड, आदि उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी प्रशिक्षण आयोजित करण्याचा उद्देश आपल्या प्रास्ताविकेतून नमूद केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज तर आभार प्रदर्शन शितल बुलबुले यांनी केले. सदर प्रशिक्षण यशस्वीतेसाठी अमर दोडमणी, बाबासाहेब पाटील, राजशेखर कमले,विक्रम शहा, कैलास जीदे ,सचिनचव्हाण,बाळासाहेब ममाने, अविनाश गायकवाड, इस्माईल मुलानी, नरेंद्र सरवदे, रीमा पवार आदींनी परिश्रम घेतले.