माळशिरस तालुक्यात शेळी, मेंढी पालन करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. यात्रेत अनेक जातींच्या शेळ्या व मेंढ्या आल्या होत्या . त्यामुळे पंचक्रोशीतील लोकांना खरेदी विक्रीचा फायदा व्हावा म्हणून बाजार भरवण्यात आला .यासाठी, बिरोबा यात्रेनिमित्त समस्त ग्रामस्थ व बिरोबा यात्रा कमिटी यांच्यावतीने भव्य शेळी मेंढी यात्रा महोत्सव पहिल्यांदाच भरविण्यात आला होता . तसेच गाय , म्हैस ,जर्शी जनावरांचा देखील बाजार बहणार होता पण आपल्या महाराष्ट्रावर लंम्पी सारख्या आजारामुळे जनावरांचा बाजार थांबवण्यात आला आहे. पुढच्या वर्षी जनावरांचा व शेळ्या व मेंढ्याचा बाजार दरवर्शी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापनेनंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शेळी व मेंढरांच्या जातीची व जनावराचा बाजार एक दिवशीय भव्य यात्रा भरणार असे तसेच यात्रेला आलेल्या सर्वानचे गावाच्या वतीने स्वागत सरपंच विजय गोरड यांनी बोलताना व्यक्त केले .
माळशिरस तालुक्यात पहिल्यानदाच गोरडवाडी येथे बिरोबा यात्रेनिमित्त भव्य शेळी - मेंढरांची यात्रा भरली या यात्रे मध्ये शेळ्या मेेंढ्या सजवुन बाजारात आणल्या होत्या.शेळ्या मेेंढ्यासाठी बाजारात विक्रीसाठी घुंगराचे पट्टे , घुंगरी ,लोकर कातरण्यासाठी कात्री ,सुती कापडाच्या रंगी बी रंगी छटणी विकण्यासाठी आल्या होत्या ,चहा ,भजी भेळीचे स्टॉल लागले होते .शेळ्या मेेंढ्याच्या बाजारात माणसाची खरेदीसाठी झुंंबड उडाली . तर काही माणसं बाजार बघण्यासाठी आली होती . तसेच राजकीय नेते नेतेमंडळींनी भव्य शेळी मेंढी यात्रा महोत्सवाला भेटी देऊन यात्रा कमीटीच कौतुक केलं .