बीड (प्रतिनिधी ) शहरातील बार्शी नाका ते महाराजांच्या पुतळा व पुढे राजुरी पर्यंत प्रचंड मोठं मोठे खड्डे पडले आहेत.रस्त्यावर खड्डे का खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. म्हणुन नागरिकांना रहदारी साठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एअर बसची व्यवस्था करावी अशी उपरोधिक मागणी वंचित बहुजन आघाडी चै मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले दरवर्षी पावसाळ्यात हिच अवस्था होते जवळच्या बगलबच्चा गुत्तेदाराकडुन थातुर मातुर खड्डे बुजुन घेतले जातात. तेच खड्डे जर चांगल्या प्रतीने बुजवले तर एक वर्षात खराब होणार नाहीत. राजुरी ते बार्शी नाका रस्त्यावर शाळा महाविद्यालये असल्याने रहदारी भरपुर असते. खाजा काॅम्पेक्स ते बार्शी नाका रस्त्याचे मोठ्या प्रमाणात उद्घाटन करून तो रस्ता अर्धवट पडला आहे. या दोन्ही रस्त्यावर खड्डे चुकवताना गरबडीत अनेक लहान मोठे अपघात रोज होत आहेत. वहानांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.संबध पावसाळा नागरीक जीव मुठीत धरून या रस्त्यावरुन जा ये करत आहेत. या दोन्ही रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीसाठी अनेक पक्ष सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते यांनी आंदोलन केली आहेत यांची थोडीही जाणीव गेंड्याची कातडी पांघरलेल्या लोकप्रतिनिधी आणी प्रशासनाला नाही. याचा आम्ही वंचित बहुजन आगीच्या वतीने निषेध करतो आहोत. यापुढे या रस्त्यावर गंभीर स्वरूपाचा अपघात होवुन कुणाचा जीव गेला तर याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील असा इशारा यावेळी हिंगे यांनी दिला आहे.