गेवराई शहरामध्ये सकाळपासून धुव्वाधार पाऊस पडत आहे. या पावसाने नद्या-नाल्यांना पाणी आले. तीन वर्षीय मुलगा बालवाडीतून घरी येत असताना त्याचा पाय घसरला आणि तो एका नाल्यात वाहून गेला. त्याचा आज दुपारपर्यंत शोध लागलेला नव्हता. सदरील हा मुलगा विद्रुपा नदीमध्ये वाहून गेला असल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी तहसीलदारांसह प्रशासकीय अधिकारी दाखल झाले होते.
गेवराई शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे चिंतेश्वर गल्लीतील नाल्याला पाणी आले होते. दुपारी बंटी ज्ञानेश्वर क्षीरसागर हा तीन वर्षीय मुलगा बालवाडीतून घरी येत होता. त्याचा पाय घसरल्याने तो नाल्यात पडला आणि वाहून गेला. त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत तो सापडला नव्हता. घटनेची माहिऋती तहसीलदार सचीन खाडे, संतोष जवंजाळ, न.प.चे येवल, लेंडाळ, पांढरे यांना झाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले होते. हा मुलगा विद्रुपा नदीमध्ये सांगण्यात आले.