पैठण :युवा कार्य व खेळ मंत्रालय भारत सरकार व नेहरू युवा केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने युवा महोत्सवाचे आयोजन दि.27सप्टेंबर 2022 रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र औरंगाबाद येथे करण्यात आले होते. यात विविध महाविद्यालयातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यामध्ये चित्रकला, फोटोग्राफी, भाषण,कविता, सांस्कृतिक, युवा संवाद अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धेत प्रथम,द्वितीय, तृतीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच युवा मंडळ पुरस्कार हा विश्व युवा मंडळास मिळाला.या कार्यक्रमास नेहरू युवा मंडळाचे अधिकारी संकल्प शुक्ल,व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शिरिष अंबेकर,तसेच अशोक बंडगर,डॉ.शेषराव पठाडे,डॉ.गजानन पेहरकर,डॉ.अजिंक्य लिंगायत,किशोर वाघ,अनिल मगर,विष्णू सुरासे,वैजनाथ कदम,डॉ. रामचंद्र झाडे,उदय भुईर,निलेश ठोकले,डॉ. अश्विन कुमार जोगदंड,डॉ. पंजाब हजारे,डॉ. दत्ता कोल्हारे,अदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश छबीलवाड यांनी केले तर आभार प्रकाश त्रिभुवन यांनी मानले.