गढी महाविद्यालयात सामाजिक शास्त्र मंडळाचे उद्घाटन..

 प्रतिनिधी गढी- जयभवानी  शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर, गढी येथे सामाजिक शास्त्र मंडळाचे उदघाटन उत्साहात संपन्न झाले. यावेळी उद्घाटक म्हणून  प्रा. डॉ. कालीदास चौधरी हे उपस्थित होते, तर अध्यक्ष  महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. सदाशिव सरकटे, सामाजिक शास्त्र मंडळ कार्यकारिणीतील अध्यक्ष शेख अल्ताफ व सचिव कु.रुक्मिणी सावंत यांची उपस्थिती होती. त्यांच्या नियुक्तीबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

                   कार्यक्रमाच्या सुरुवातीला  सध्याच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्यशास्त्र व समाजशास्त्र विभागाच्यावतीने  प्रा. डॉ.जयराम ढवळे व प्रा. डॉ. रामदास खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेले महापूर व गृहशास्त्र विभागाद्वारे राष्ट्रीय पोषण माहच्या निमित्ताने प्रा. डॉ. राणी जाधव व प्रा.डॉ.अयोध्या पवळ  यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या  पोषणमाह  या भित्तीपत्रकाचे  अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उदघाटनपर भाषणात डॉ. कालिदास चौधरी यांनी ग्रीक कालखंडातील तत्वज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना देतांनाच सॉक्रेटीस, प्लेटो, ॲरिस्टॉटल यांचे  तत्वज्ञान व आजच्या संदर्भात विविध उदाहरणांच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांना  पटवून दिले.याबरोबर सामाजिक शाखांच्या माध्यमातून विद्यार्थ्यानी  अधिक सजग राहून इतिहासातील घडामोडींचा अभ्यास करून आपले  भविष्य घडविण्याचे अवाहन त्यांनी केले.