सेलु(प्रतिनिधी)दि.२७ सेलू. श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलमध्ये विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आज संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आज या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात शाळेची माजी टॉपर विद्यार्थिनी प्रेरणा भरत सवणे हिची पहिल्याच फेरीत आयआयटी IITगांधीनगर गुजरात येथे केमिकल इंजिनिअरिंग साठी निवड झाली. या अतुलनीय यशासाठी प्रेरणा व त्यांच्या आईवडिलांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी हार, पुष्पगुच्छ देऊन केला. तसेच अंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड परीक्षांमध्ये शौर्य दत्तात्रय काकडे या विद्यार्थ्याने भारतामधून प्रथम क्रमांक मिळवला. या यशासाठी व त्यांचे आई-वडील यांचाही सत्कार डॉ. संजय रोडगे सरांनी मोठया थाटा माटात केला.तसेच शिवोहम शिंदे वर्ग १० वी, ख़ुशी मानधणे वर्ग ८ वी, अथर्व नंद, श्रुती हाडुळे वर्ग ८ वी,ओलंपियाड परीक्षेत एनएसओ, आईएमओ, सायबर ओलंपियाड विभागीय विशेष प्रावीण्यसह गोल्ड मेडल मिळविले. या विद्यार्थ्यांचा ही पालकां समवेत सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यात अध्यक्ष स्थानी डॉ. संजय रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, शाळेचे प्राचार्य कार्तिक रत्नाला, डॉ. दत्तात्रय काकडे डॉ. दत्तात्रय नंद, भरत सवणे सर अरुण जाधव सर डॉ. स्वप्निल मंत्री,माधव हाडोळे सर,बाबासाहेब काष्टे सर,डॉ. मानधणे, डॉ. काकडे मॅडम, डॉ शिंदे मॅडम, खजिने मॅडम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती बरोबरच कौशल्य विकास यावर, खेळ - व्यायामकडे ही लक्ष द्यावे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न करावा. ज्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार झाला नाही त्यांनी खचून न जाता पुन्हा यशस्वी होण्याची जिद्द बाळगली पाहिजे. केवळ एका परीक्षेने सर्व दारे बंद होत नाहीत. जीवनात करण्यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा शोध घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा व तिथे यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा व पालकांनीही त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. आज शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे हा शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी राबविले जाणारे उपक्रम चा आहे. असे मत अध्यक्ष भाषणात डॉ. संजय रोडगे यांनी व्यक्त केले.पालक प्रतिनिधी या नात्याने डॉक्टर मानधने डॉक्टर आशिष मेहता डॉक्टर काकडे, सवणे मॅडम व इतर पालकांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशासाठी श्रेय शाळेत राबविले जाणारे उपक्रम व डॉ संजय रोडगे सरांना दिले.शाळेतील गुणवत्ता पूर्ण प्रकल्प अंतर्गत प्रेसिडेन्शिअल टेस्ट घेण्यात येते या टेस्टमध्ये प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना केसरी व पिवळ्या रंगाची कॅप अनुक्रमे देण्यात येते. हा सत्कार सोहळा ही आज पार पडला तसेच ओलंपियाड अबॅकस व विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना आज पालकांसमवेत सन्मानित करण्यात आले. व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे संचालन प्रमोद जाधव व आभार प्रदर्शन कल्पना बाबट यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.