हिंगोली

येथे झालेल्या सर्पमित्र मेळावा सोहळ्यामध्ये शेगाव येथील पाच सर्पमित्रांना "द रियल हिरो 2022 "चा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंगोली येथील महावीर भवन येथे 23 सप्टेंबर 2022 रोजी हा सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील प्रथम सर्पमित्र म्हणून प्रख्यात सर्प तज्ञ गुरुवर्य डॉक्टर नीलिम खैरे  यांच्या हस्ते शेगाव येथील गगन कचोरी येथील ,कार्यरत असलेले सर्पमित्र करण ठाकूर, सोनू बारगड ,उमेश सहारे, करण शुक्ला, संदीप संदूर अशा पाच सर्पमित्रांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल 2022 अवार्ड ने सन्मानित करण्यात आले. या सर्वांना  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला संजय नाकोडे, देवदत्त शेळके ,

गणेश मेहंदळे डॉक्टर श्रीधर कंदी ,दिलीप मस्के, विजयराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शेगाव शहराला प्रथमच मिळालेले या सन्मानाबद्दल सर्व सर्पमित्राचे कौतुक करण्यात आले आहे.