परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील नागपूर प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी विकास मोराळे यांची महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी बीड जिल्हा संघटनेच्या सचिवपदी नुकतीच निवड झाली आहे.तर अध्यक्ष म्हणून आष्टीचे डॉ.प्रसाद वाघ हे अध्यक्ष झाले. वैद्यकीय अधिकारी विकास मोराळे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी शासकीय डॉक्टरांची संघटना आहे.या संघटनेची नुकतीच अध्यक्षसह व सचिव पदासाठी निवडूनक घेतली होती.त्यात अध्यक्ष म्हणून आष्टीचे डॉ. प्रसाद वाघ हे निवडून आले. तसेच परळी वैजनाथ येथील डॉ.विकास मोराळे यांची सचिव पदी निवडून आलं.अन्यायाविरोधात आवाज उठविला जाईल चुकीच्या गोष्टीचे समर्थन केले जाणार नाही.डॉक्टरासाठी आम्ही व संघटना कायम तत्पर असू ही निवडूनक खरोखरचं खूप प्रतिष्ठची झाली होती.अनेकांनी मला पाठबळ दिले,दिलेल्या जबाबदारी चोख पार पाडेल,अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.प्रसाद वाघ व सचिव विकास मोराळे यांनी दिली आहे. वैद्यकीय अधिकारी विकास मोराळे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.