माळशिरस तालुक्यातील अकलूज गावचे ग्रामदैवत असणाऱ्या आई अकलाई देवीच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आज दुसऱ्या दिवशी देवीची रत्नजडित अलंकारयुक्त महापूजा करण्यात आली.

देवीचे पुजारी मोहन गुरव व परिवाराच्या वतीने कार्यकारी विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ दिवस देवीची विविध वेगवेगळ्या रूपामध्ये महापूजा करण्यात येते.