शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न पॅटर्न, अकलूज इ. 11वी मधील विद्यार्थी जगजितसिंह बाबासाहेब गोडसे याने 17 वर्षाखालील महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करताना राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये खुल्या वजन गटात ग्रीको रोमन प्रकारामध्ये भारत देशामध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे.

यावेळी जगजितसिंह बाबासाहेब गोडसे याच्या या यशाबद्दल त्याचे व त्याच्या पालकांचे शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील, उपाध्यक्षा तथा शिवरत्न पॅटर्नचे चेअरपर्सन शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच प्रशालेचे प्राचार्य,समन्वयक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.